Jump to content

तापमापक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तापमापी या पानावरून पुनर्निर्देशित)
तापमापक

तापमापक हे उपकरण तापमान मोजण्यासाठी वापरतात. कोणताही द्रव पदार्थ, त्याचे तापमान वाढले की प्रसरण पावतो व थंड होतांना आकुंचित होतो हे तत्त्व पारंपारिक तापमापक यंत्रात वापरले जाते. तापमापकांत दोन महत्त्वाचे भाग असतात. तापमान संवेदक (उदा. पारा, अल्कोहोल) ज्याचे आकारमान उष्णतेने वाढते आणि मापन तालिका ज्याद्वारे प्रसारित आकारमान मोजता येते. अद्ययावत तापमापकांत इलेक्ट्रॉनिक्सचा वापर केला जातो. ( Heat Dependent Transistors + Electronic Display ) तापमापनाची एकके फॅरेनहाईट,सेल्सियस,सेंटीग्रेड, केल्विन इत्यादी आहेत.