Jump to content

नील आर्मस्ट्राँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नील आर्मस्ट्रॉँग या पानावरून पुनर्निर्देशित)
नील आर्मस्ट्रॉंग
Neil Armstrong (इंग्रजी)
जन्म ५ ऑगस्ट, १९३०
वापाकानेटा, ओहायो, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मृत्यू २५ ऑगस्ट, २०१२ (८२ वर्ष)
कोलंबस, ओहायो, अमेरिका
मृत्यूचे कारण हृदयशस्त्रक्रियोत्तर गुंतागुंत झाल्याने
राष्ट्रीयत्व अमेरिकन
नागरिकत्व अमेरिकन
शिक्षण पर्ड्यू विद्यापीठ
पेशा अंतराळयात्री, अंतरीक्ष अभियंता, लष्करी वैमानिक
कारकिर्दीचा काळ इ.स. १९४९-इ.स. १९७९
प्रसिद्ध कामे चंद्रावर पोचलेला पहिला मनुष्य
स्वाक्षरी

नील आर्मस्ट्रॉंग (ऑगस्ट ५, इ.स. १९३० - ऑगस्ट २५, इ.स. २०१२) हा एक अमेरिकन अंतराळयात्री, आंतरिक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता. आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव होता.

नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्रॉंगने २० जुलै, इ.स. १९६९ रोजी २०:१७:३९ यूटीसी ह्या वेळेला चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत (२१ जुलै, १९६९, २:५६ यूटीसी) त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले. आर्मस्ट्रॉंग हे दोन तास ३२ मिनिटे आणि आल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा १५ मिनिटे कमी काळ चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. "ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,' असे आर्मस्ट्रॉंग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते.दै.सकाळ मधील माहिती[मृत दुवा]विदागारातील आवृत्ती

नील आर्मस्ट्रॉंगचे चंद्रावरील पहिले उद्गारः That's one small step for [a] man, one giant leap for mankind

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: