Jump to content

पुंता काना आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पंटा काना आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

पुंता काना आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PUJआप्रविको: MDPC) हा डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या पुंता काना शहरातील विमानतळ आहे. डिसेंबर १९८३मध्ये सुरू झालेला हा विमानत जगातील पहिला खाजगी मालकीचा विमानतळ आहे.

येथून कॅरिबियन आणि उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोपमधील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. येथून वर्षाकाठी विमानांची सुमारे ६ लाख ये-जा होतात. यातून ६३ लाख पेक्षा जास्त प्रवासी डॉमिनकन प्रजासत्ताकात येतात व जातात.

या विमानाची इमारत पारंपारिक डॉमिनिकन पद्धतीने बांधण्यात आलेली असून हिचे छत नारळी आणि पोफळीच्या झावळ्यांनी झाकलेले आहे.