Jump to content

रवींद्र चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रविन्द्र चव्हाण या पानावरून पुनर्निर्देशित)
रविंद्र चव्हाण

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ डोंबिवली

जन्म २० सप्टेंबर, इ.स. १९७०
कल्याण, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू धर्म
या दिवशी २१ नोव्हेंबर, २०१७

रविंद्र चव्हाण (२० सप्टेंबर, १९७०:कल्याण, महाराष्ट्र, भारत - ) हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे डोंबिवली मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. [१] ते महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्यांचे राज्यमंत्री होते. २०२२ साली स्थापन झालेल्या, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ही खाती देण्यात आलेली आहेत. [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "रवींद्र चव्हाण यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ". दिव्य मराठी.
  2. ^ "मोठी बातमी! एकनाथ शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण यादी!". Loksatta. 2022-08-15 रोजी पाहिले.