Jump to content

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिकसमाजसेवक यांना पुरस्कार देण्यात येतो. ही योजना दि. १९ जुलै १९९७ पासून कार्यान्वित आहे.

निकष व अटी[संपादन]

महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी खालील निकष व अटी ठरवलेल्या आहेत.[१]

व्यक्तींसाठीचे निकष
  • सामाजिक क्षेत्रातील कार्याचा १० वर्षाचा अनुभव.
  • पुरस्कार फक्त मातंग समाजातील व्यक्तीकरिता असेल.


संस्था
  • मांतग समाजाच्या कल्याणासाठी १० वर्षाहून अधिक काळ मौलिक कार्य केलेले असावे.

शिफारश पद्धती[संपादन]

या पुरस्कारासाठी शिफारश पद्धती खालीलप्रमाणे आहे.[१]

  • व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र
  • विना दुराचार प्रमाणपत्र
  • गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र
  • सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र
  • संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल

लाभाचे स्वरूप[संपादन]

२५ व्यक्ती व ६ संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. संस्थांना प्रत्येकी ५०,००० रुपये, शाल व श्रीफळ तर प्रत्येक व्यक्तीस २५,००० रुपये, शाल व श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, खण व सपन्तिक गौरव. एक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस मार्फत एस टी बस प्रवास सवलत.

हे ही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार. | Social Justice & Special Assistance Department". sjsa.maharashtra.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-18 रोजी पाहिले.