Jump to content

व्हिसेंते यानेझ पिंझोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हिसेन्ते यानेझ पिन्झोन या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हिसेंते यानेझ पिंझोन (स्पॅनिश: Vicente Yáñez Pinzón ;) (इ.स. १४६० - इ.स. १५२३नंतर) हा स्पेनचा शोधक आणि काँकिस्तादोर होता. तो क्रिस्टोफर कोलंबसाच्या पहिल्या सफरीतील तीन जहाजांपैकी एका जहाजाचा वाटाड्या होता, तर त्याचा भाऊ मार्टिन अलोंझो पिंझोन त्याच जहाजाचा निन्या कप्ताम होता.

अमेरिकेच्या सफरीनंतर इ.स. १४९९मध्ये पिंझोन दक्षिण अमेरिकेकडे निघाला. जानेवारी २६, इ.स. १५०० रोजी समुद्री वादळात भरकटत सध्याच्या ब्राझिलच्या पेर्नांबुको राज्यातील प्रैया दो परैसो येथे उतरला. ब्राझिलमध्ये पोचणारा हा पहिला युरोपीय होय. पिंझोनाने या जागेला काबो दि सांता मारिया दिला कॉन्सोलेसियोन असे नाव दिले. पुढे तो ऍमेझॉन नदीच्या मुखापर्यंत गेला. या नदीला त्याने रियो सांता मारिया दिला मार दुल्से हे नाव दिले.

इ.स. १५०५मध्ये स्पेनने पिंझोनाला पोर्तो रिकोचा राज्यपाल केले.

इ.स. १५२३ सालानंतर याचा कोठेही उल्लेख आढळत नाही.

बाह्य दुवे[संपादन]