Jump to content

सीतास्वयंवर (नाटक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक) या पानावरून पुनर्निर्देशित)
सीतास्वयंवर
लेखन विष्णूदास भावे
भाषा मराठी
विषय रामायणातील सीतास्वयंवराचे आख्यान
निर्मिती वर्ष १८४३
दिग्दर्शन विष्णूदास भावे
गीत विष्णूदास भावे

सीता स्वयंवर हे १८४३ साली रंगमंचावर प्रथम आलेले नाटक मराठी आधुनिक नाट्यपरंपरेतील पहिले नाटक मानले जाते. आधुनिक मराठी नाटकांचे जनक मानल्या जाणाऱ्या विष्णूदास भाव्यांनी हे नाटक लिहिले व बसवले होते. नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉलात' झाला.

पार्श्वभूमी[संपादन]

विष्णूदास भाव्यांचे वडील अमृतराव भावे हे सांगली संस्थानाचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या दरबारी सेवेत होते. कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' / यक्षगान करीत, त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी विष्णूदास भाव्यांना आज्ञा केली. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीतास्वयंवर नाटक उभारले. ५ नोव्हेंबर, १८४३ रोजी चिंतामणराव पटवर्धनांच्या दरबारात नाटकाचा पहिला खेळ रंगला.

हे सुद्धा पहा[संपादन]