Jump to content

अभिजीत कोसंबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महागायक डॉ. अभिजीत कोसंबी
आयुष्य
जन्म २४ जानेवारी १९८२
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म बौद्ध
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई shailaja kosambi
वडील rajvardhan kosambi
अपत्ये master animesh kosambi
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायक

अभिजीत कोसंबी हा कोल्हापूरचा एक गायक आहे. त्याने २००७ साली झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरची सा रे ग म प संगीत स्पर्धा जिंकून स्पर्धेचा पहिला 'महागायक' होण्याचा सन्मान मिळविला.[ संदर्भ हवा ] कोसंबी गझलकार, संगीतकार, गीतकार म्हणून सुद्धा ओळखले जातात.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रात तसेच भारतभरात त्यांनी विविध कार्यक्रम व स्टेज शो ते करत असतात. सध्या ते कोसंबी म्युझिक अकॅडमी मुंबई येथे "संगीत गुरु" व "संचालक" पदावर कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ]

कोसंबी यांचा जन्म 24 जानेवारी 1982 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांनी, पंडित अरुण कुलकर्णी, रजनी करकरे देशपांडे तसेच भारती वैशंपायन यांच्या कडून संगीताचे धडे घेतले.[ संदर्भ हवा ] कोसंबी यांनी संगीतात कला शाखेतून पदव्युत्तर शिक्षण आणि पी एच डी केली आहे. याशिवाय त्यांनी इंग्रजी विषयात देखील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.[ संदर्भ हवा ]

गाणी[संपादन]

कोसंबी यांनी तन्हाजी या मराठी चित्रपटात 'गीतकार ' म्हणून काम केले. तसेच चाहतो मी तुला, मन वेडावलंय, दर्याचे आम्ही राजे हो, पाऊस हा ही गाणी केली. तसेच संगीतकार आदित्य नाना जाधव यांची गुंतले हृदय व नाजूक परी  ही देखील गाणी गायली आहेत.[ संदर्भ हवा ]


संदर्भ[संपादन]