Jump to content

अमळनेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?अमळनेर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

२१° ०३′ ००″ N, ७५° ०३′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ७०० मी
जिल्हा जळगाव
तालुका/के अमळनेर
लोकसंख्या ९६,४५६ (2009)

अमळनेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. अमळनेर हा जळगाव जिल्ह्यातला सर्वांत मोठा तालुका समजला जातो. अमळनेर हे शहर बोरी नदीच्या काठावर वसलेले असून. नदीकिनारी वाडी संस्थान हे तीर्थक्षेत्र आहे. ह्या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर असून, संत सखाराम महाराज ह्यांची ही कर्मभूमी आहे. अमळनेर तालुक्यातून वाहणारी सूर नदी ही आणखी एक नदी आहे. बोरी आणि सूर या दोन्ही नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत.

साने गुरुजी यांचे अमळनेर येथे वास्तव्य होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात साने गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. आता ही संस्था खानदेश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते. तालुक्यात 152 खेडी आहेत.

इतिहास[संपादन]

खानदेशातील एक महत्त्वाचे गाव म्हणजे अमळनेर. या शब्दाची उत्पत्ती अमळनेर म्हणजे मलविरहीत ग्राम म्हणजे अमळनेर, अशी दिसते. अमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध शहर आहे. सन १९०६ पुर्वी हल्लीचे जळगाव व धुळे ( पुर्वीचे पुर्व खानदेश व पश्चिम खानदेश ) या दोन जिल्ह्याचे मिळून एकच मोठा जिल्हा होता व त्यास खानदेश जिल्हा असे नाव होते. त्यावेळच्या खानदेशातील अमळनेर हे मध्यवर्ती ठिकाण म्हणता येईल. अमळनेर शहर पश्चिम रेल्वेच्या भुसावळ-सुरत मार्गावर आहे. ते जळगावपासून पश्चिमेकडे ५६ किलोमीटर व धुळ्यापासून पुर्वेकडे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. भौगोलिक दृष्ट्या अमळनेर हे २१.३ उत्तर अक्षांशावर व ७५.१ पुर्व रेखांशावर आहे. हे तापी नदीच्या खोऱ्यात बोरी नदीच्या डाव्या काठावर वसले आहे. नदीमुळे शहराचे दोन भाग झाले असुन उजव्या तीरावरील वस्तीस पैलाड म्हणतात.पैलाडच्या पलीकडे ताडेपुरा, शनिपेठ व सिंधी कॅम्प असा परिसर आहे. समुद्र सपाटीपासुन गावाची उंची सुमारे ६०८ फूट ( सुमारे १८५ मीटर ) आहे. शहराचा उतार सामान्यतः दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. टाऊन प्लॅनिंगमुळे हल्ली शहरांची पस्चिमेकडे वाढ होत आहे. या शहराचे उन्हाळ्यात कमाल उष्णतामान ११२ ( घरात ) व ११६ – ११८ ( बाहेर ) आहे. पावसाचे मान सरासरी २७ इंच आहे.

अमळनेर हे शहर बोरी नदीचा काठावर वसलेले असून. नदी किनारी वाडी संस्थान हे तीर्थक्षेत्र आहे. ह्या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर असून, संत सखाराम महाराज ह्यांचे ही कर्मभूमी आहे. अमळनेरात मंगळ महाराज यांचे देवस्थान आहे, येथे दर मंगळवारी हजारो भाविक येत असतात। पांडुरंग सदाशिव सानेगुरुजी यांचे येथे वास्तव्य होते. अमळनेर मधील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे साने गुरुजी यांनी शिक्षण घेतले त्यानंतर त्यांना प्रताप शेटजींनी अमळनेरात थांबण्यास सांगितले। स्वातंत्र्यपुर्व काळात साने गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. आता ही संस्था खान्देश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते. अमळनेर शहर जळगाव जिल्ह्यात असुन ब वर्ग नगरपालिका आहे. शहराची लोकसंख्या १ लक्ष पर्यंत आहे. अमळनेर शहरात आद्य श्री सखाराम महाराज यांचा यात्रा उत्सव वैशाख शुद्ध एकादशी पासुन सुरू होतो एकादशीला रथ उत्सव असतो व पौर्णिमेला पालखी असते व यात्रा उत्सव बोरी नदी पात्रात महिनाभर भरते यात्रेस जळगाव , धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नासिक इत्यादी ठिकाणावरून भाविक व वारकरी येत असतात.

सुमारे दीडशे-पावणेदोनशे वर्षापुर्वी अमळनेर येथे श्री सखाराम महाराज या नावाने एक प्रसिद्ध साधू होऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ बोरी नदीच्या पात्रात त्यांची समाधी बांधली आहे. वैशाख महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे व त्यांच्यानंतर चालत आलेल्या परंपरेमुळे अमळनेरला एक क्षेत्र म्हणून त्यावेळी मिळालेली प्रसिद्धी आज कायम असुन ते खानदेशचे पंढरपुर समजले जाते.

अमळनेर हे ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण होते.नदीच्या काठी हल्ली एक पडकी गढी आहे.ती गढी म्हणजे भग्नावस्थेतील लहानशा भुईकोट किल्ल्याचे आजचे स्वरुप आहे.पेशवाईच्या काळी या किल्याची व्यवस्था पेशव्यांच्या वतीने मालेगांव येथील राजेबहाद्दरांकडे होती सन १८१८ मध्ये ब्रिटीशांनी खानदेशावर आपला ताबा बसविला.त्यावेळी ह्या किल्ल्यात असलेल्या अरब शिपायांनी ब्रिटीशांच्या ताब्यात हा किल्ला देण्याचे नाकारले.तेव्हा मालेगाव येथून कर्नल हस्किसन्स याच्या अधिपत्याखाली ब्रिटाशाची सुमारे एक हजार फौज तोफखाना व घोडदळ यांसह किल्ल्यावर चालून आली.अरब शिपायांनी आरंभी थोडासा प्रतिकार केला.परंतु एवढ्या मोठ्या फौजेशी सामना देणे त्यांना शक्य झाले नाही अखेर त्यांना किल्ला खाबी करावा.त्यांनी आपली शस्त्रे किल्ल्याबाहेर आणून ठेविली व ते नदीच्या पात्रात अले.तेथे त्यांना ब्रिटीशांना कैद केले.त्या वेळेपासुन अमळनेर हे ब्रिटीशांच्या अमलाखाली आले.

मोठ्या शहरात आढळणा-या सुखसोई हल्ली अमळनेरात झाल्या असून राहिलेली अपुर्तता दुर करण्याकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे.जुनी व नवी अशा दोन प्रताप मिल्स,वनस्पती तुपाचे कारखाना विप्रो,तेलाच्या गिरण्या, जिनिंग फॅक्टरी, प्रताप कॉलेज, प्रताप हायस्कुल व इतर माध्यमिक शाळा, अखिल भारतास ललामभीत ठरलेले व श्रीमंत प्रताप शेठजींच्या तत्त्वज्ञानप्रेमाचे द्योतक असलेले अखिल भारतीय तत्त्वज्ञान मंदिर,प्रताप हॉस्पीटल, राम मंदिर इत्यादी अनेक उपयुक्त संस्था येथे आहेत अणि त्यामुळे अमळनेरचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रीय व कामगार चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही अमळनेरचा लौकिक आहे.

अमळनेरात श्रीरामशास्त्री उपासनी हे प्रख्यात संस्कृत व ज्योतिष विद्वान होवून गेले. त्यांनी त्याकाळी काशि क्षेत्रात गुरुकुल पद्धतीने सांगवेद विद्यालयात वेद, उपनिषदे, षड्दर्शनशास्त्रे यांचे ज्ञान प्राप्त केले होते. अमळनेरच्या प्रताप विद्यालय व प्रताप महाविद्यालयात त्यांनी संस्कृत अध्यापनाचे कार्य केले. वेद, हिंदू धर्मशास्त्र, जैन आगम, बौद्ध धम्मशास्त्र आणि आणि तत्वज्ञान यावरील त्यांच्या गाढया अभ्यासामुळे अनेक धर्मिय साधू व विद्वान त्यांचे भेटीसाठी येत असत. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण्न यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

अझीम प्रेमजी यांच्या वडिलांनी अमळनेरात विप्रोची सुरुवात केली होती। अमळनेरसारख्या तालुक्याच्या व दळणवळणाच्या दृष्टीने अडवळणाच्या अशा या गावी नियतकालिकेही चालविण्याचे प्रयत्न वेळोवेळी निरनिराळ्या साहित्यिकांकडून करण्यात आले.त्यात प्रथम श्री वासुदेव कृष्ण भावे यांच्या बालवसंत व नागरिक या दोन साप्ताहिकांचा व निकास मासिकाचा उल्लेख केला पाहिजे.खानदेशबद्दल ज्यांना विशेष अभिमान व आत्मियता वाटल असे व ज्यांच्यामुळे खानदेशचे व विशेषतः अमळनेरचे नाव घेतले जाते ते सर्वांच्या सुपरिचयाचे व कट्टे कर्मयोगी कै.पुज्य सानेगुरुजी यांनी चालविलेल्या काँग्रेस सापातहिकाडे उल्लेख करताना अमळनेरकरांना विशेष अभिमान वाटणे साहजिक आहे. कै. पुज्य सानेगुरुजी येथील हायस्कुलमध्ये शिक्षक असताना त्यांनी प्रौढ विद्यार्थ्यांकरीता विद्यार्थी मासिक काढले होते.त्या मासिकाचा दर्जा तात्कालीन मराठी मासिकात उल्लेखनिय होता. तत्त्वज्ञान मंदिरामार्फत तत्त्वज्ञान मंदिर हे उच्च दर्जाचे व तत्त्वज्ञानविषयक तत्त्वज्ञानास वाहिलेले त्रैमासिक प्रसिद्ध केले जात असे. येथे एकनाथ धर्मा दाभाडे,माधवराव सुतार ,कृष्णा पाटील , डिगंबर महाले,राजकुमार छाजेड ,मधुकर अमळगावकर , प्रभाकर देशमुख ,चंद्रकांत काटे ,संजय पाटील, चेतन राजपूत ,उमेश धनराळे, जयंतलाल वानखेडे,उमेश काटे, जयेश काटे, धनंजय सोनार या पत्रकारांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

वाङमय विकास मंडळातर्फे सन १९४१ मध्ये संयुक्त खानदेश साहित्य संमेलन आनंद मासिकाचे संपादक श्री गोपीनाथ तळवळकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.तसेच मराठी वाङमय मंडळाच्या वतीने सुप्रसिद्ध साहित्यिक श्री.कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ साली महाराष्ट्र साहित्य संमेलन भरले होते.यावरून व्यापार, उद्योगधंदे यांच्याप्रमाणे अमळनेर हे शिक्षण व साहित्य या बाबतीतही प्रसिद्ध असल्याचे दिसून येईल. खान्देशातील प्रमुख ग्रामीण बोली भाषा अहिराणी असून या भाषेत जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांनी संशोधन केले. त्यांना सर्वोच्च अखिल भारतीय साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार मिळाला आहे.

भूगोल[संपादन]

अमळनेरचा विस्तार बऱ्यापैकी मोठा आहे । पश्चिम दिशेला धुळे रस्त्याला मंगरूळ पर्यंत वस्त्या वाढल्या आहेत, तसेच ढेकू व पिंपळे आणि गलवाडे रस्त्याला पण वस्ती खूप जलद गतीने वाढत आहे।

मारवड-अमळनेर पासून जवळच दहा किलोमीटर अंतरावर मारवड हे शैक्षणिक व राजकीय आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत असे गाव आहे.या गावातील रहिवासी असलेल्या श्री.यशवंतराव अप्पा श्री.रामदास वेडू सोनवणे,श्री.बाबुराव आबा,श्री.माणिक शेट या स्वातंत्र्य सैनिकांनी डांगरी येथील श्री.उत्तमराव पाटील,सौ.लिलाताई पाटील,श्री.शिवाजीराव गिरधर पाटील यांचे सोबत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भरीव योगदान दिले होते. या गावात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड,सारख्या शिक्षण संस्था आहेत.प्राथमिक,माध्यमिक उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाची येथे उत्तम व्यवस्था आहे. या गावातून शिक्षण घेतलेले मारवडचे मूळ रहिवासी असलेले श्री.शरद बागुल श्री.संदीपकुमार साळुंखे,स्व.गिरीश पाटील,प्रा.डॉ.दशरथ साळुंखे,श्री.इंजि.विजय भदाणे,श्री.राकेश साळुंखे,श्री.तुषार गरुड,श्री.तुषार साळुंखे हे मारवडचे सुपूत्र महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या सेवेत विद्याविभूषित व उच्चपदस्थ अधिकारी म्हणून सेवेत कार्यरत आहेत.तसेच श्री.शांताराम बापू साळुंखे,श्री.वसंतराव चुडामण साळुंखे,श्री.जयवंतराव साळुंखे,सौ.प्रभावतीताई साळुंखे,श्री.एल्.एफ.नाना साळुंखे,श्री.गोविंददादा मुंदडे,श्री.ओमप्रकाश मुंदडे, श्री.योगेश मुंदडे,श्री.उमाकांत दिनकर साळुंखे,श्री.रावसाहेब मांगो पाटील,श्री.राजेंद्र पुंडलिक साळुंखे,सौ.रागिणी किशोरराव चव्हाण-साळुंखे हे दिग्गज जिल्ह्यातील राजकीय व शिक्षण क्षेत्रातील पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. येथे विविध सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रम व संपन्न होतात.यासाठी श्री.राजेंद्र सुर्यवंशी,श्री.निंबा साहेबराव आणि श्री.शरद वामनराव साळुंखे सदैव योगदान देतात.

उपनगरे[संपादन]

अमळनेर तालुक्यात महत्त्वाची गावे व उपनगरे आर के नगर, पैलाड, सानेनगर, जवखेडे, आनोरे,आर्डी,पिंपळे, मंगरुळ,दहिवद,निमझरी,अमळगाव, गांधली, मारवड,कळमसरे,शहापुर, चौबारी,निम,शिरुड,पिळोदा, मुडी,पिंपळी,जुनोने,फाफोरे, गलवाडे,पाडसे, एकलहरे,एकतास, भरवस,पातोंडा,वावडे,मांडळ,तरवाडे, शिरसाळे, ढेकुअंबासन,मेहेरगाव,नांदगाव,पिंगळवाडे

अर्थकारण[संपादन]

अमळनेर हे लखपती लोकांचे गाव म्हणून ओळखले जाते, विप्रो मध्ये आधी ज्या लोकांनी पैसे गुंतवले आहेत ते आज करोडपती झाले आहेत. अमळनेरला मोठी बाजारपेठ आहे. बाहेर गावाचे खूप लोक बाजार साठी अमळनेर येतात , अमळनेर मधील कपडा मार्केट प्रसिद्ध आहे.

बाजारपेठ[संपादन]

अमळनेर मध्ये सोमवारी बाजार भरतो । अमळनेरचे कापड मार्केट प्रसिद्ध आहे। तसेच सराफ बाजार देखील प्रसिद्ध आहे , जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बाजार समिती अमळनेरला आहे । येथे आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल विकायला आणतात.केदार आप्पा यांच्या कडचे पेढे चविष्ट आहेत.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

अमळनेर रेल्वे स्थानक, [उधना-जळगाव रेल्वेमार्गावरील] मोठे स्थानक आहे. येथून भारतातील प्रमुख शहरांना रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

येथून धुळे, जळगाव आणि महाराष्ट्र तसेच आसपासच्या राज्यांतील शहरांना बससेवा आहे.

संस्कृती[संपादन]

रंगभूमी[संपादन]

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर

चित्रपट[संपादन]

तंबोली टाॅकिज

धर्म- अध्यात्म[संपादन]

संत सखाराम महाराज समाधी मंदिर , अंबर्शी टेकडी विष्णुदेवाचे एकमेव मंदिर , अंतुर्ली रंजाणे येथील कार्तिक स्वामी मंदिर , चांदणी कुऱ्हे येथील सती माता मंदिर ,अतिप्राचीन अतिजागृत भारतातील एकमेव मंगळग्रह मंदिर*

शिक्षण[संपादन]

प्राथमिक विशेष शिक्षण[संपादन]

1.प्रताप हायस्कूल 2.गंगाराम सखाराम हायस्कूल 3.श्रीमती दौपदाबाई हायस्कूल 4.इंदिरा गांधी माध्यमिक हायस्कूल 5.श्री शिवाजी हायस्कूल

सेमी मिडीअम 1.ग्लोबल स्कूल 2.पी.बी.ऐ.स्कूल 3.साने गुरुजी विद्यालय.

उच्च शिक्षण[संपादन]

महाविद्यालये[संपादन]

  • प्रताप महाविद्यालय,
  • धनदाई माता महाविद्याल, ढेकू रोड, अमळनेर,
  • पंडित जवाहरलाल नेहरू सामाजिक महाविद्यालय,
  • एस एन डी टी महाविद्यालय, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, पैलाड, अमळनेर
  • सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय
  • शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमळनेर

संशोधन संस्था[संपादन]

प्रताप महाविद्यालय