Jump to content

असा मी असामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
असा मी असामी
लेखक पु. ल. देशपांडे
भाषा मराठी
साहित्य प्रकार काल्पनिक आत्मचरित्र
प्रकाशन संस्था मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती १९६४
चालू आवृत्ती १७

असा मी असामी मध्ये पु.ल. एका मध्यमवर्गीय माणसाचे व आजूबाजूच्या परिस्थितीचे चित्र रेखाटतात.

धोंडो भिकाजी कडमडेकर जोशी नावाच्या गिरगावात रहायला असणाय्रा एका सामान्य कारकुनाचे हे खास पु. लं. च्या शैलीतले "आत्मचरित्र" आहे. गिरगावातील चाळीतले प्रसंग, लग्नाचा प्रसंग आणि त्यातला उखाणा घ्यायचा किस्सा, पार्ल्याच्या मावशीचे घर शोधणे, ठिगळ्याचे टेलरिंग शिकवणे, एकत्र नानू सरंजाम्याच्या नाटकाला जाणे, सांताक्रूझच्या गुरुदेवांचे प्रवचन अशा अगदी साध्या प्रसंगांतून हसता हसता पुरेवाट होते. नंतर आधुनिक परिस्थिती प्रमाणे राहणीमान व एकंदर जीवनात झालेल्या बदलांचे चित्रण करण्यासाठी मुख्याध्यापिका सरोज खरे यांची भेट तर केवळ अप्रतिम.

शेवटी पु.ल. म्हणतात, "त्यावेळचा तो धोतरवाला धोंड्या जोशी तो तसा मी होतो आजचा डी.बी. जोशी हा असा मी आहे. ह्यापुढला कसा मी होईन हे मी आजच काय सांगू? हे इतकं पुराण सांगायचा उद्देश केवळ आज आपला जसा मी आहे ते कळावे......"