Jump to content

आम्लपित्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सूचना
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा.

आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब- याच माणसांना कधीना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात. खालील कारणांनी आम्लता येऊ शकते. - नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे. - मानसिक ताण, काळजी, सदैव घाई-गडबड. - अनियमित जेवणाची सवय., जागरण - धूम्रपान, तंबाखूसेवन, दारूसेवन, इत्यादी. - काही औषधांमुळे आम्लता होते. उदा. ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे. - हेलिकोबॅक्टर नावाच्या एका जिवाणूंशी आम्लता आणि जठरव्रणाचा संबंध आढळला आहे. जठरव्रणापैकी साठसत्तर टक्के जठरव्रण हे या जिवाणूंमुळे होतात. (यासाठी डॉक्सी किंवा ऍमॉक्सिसिलीन हे औषध पाच दिवस देऊन पहावे.) आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थांबते तरी किंवा वाढते तरी. आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी. उपचार - जेवणात नियमितता ठेवावी. - साधा आहार घ्यावा. तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत. - मानसिक ताण, काळजी, सदैव चिंता यांच्यावर नियंत्रण ठेवावे. (व्यायाम, विश्रांती, करमणूक वगैरेमुळे उपयोग होईल.) - आम्लविरोधी (ऍंटासिड) गोळया घेतल्यावर जळजळ कमी होते. दुधामुळे काही जणांची आम्लता कमी होते तर काही जणांची वाढते. - आयुर्वेद - सूतशेखर मात्रा (गोळी). होमिओपथी निवड आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, कॉस्टिकम, फेरम फॉस, लायकोपोडियम, नक्स व्होमिका, पल्सेटिला, सल्फर. शोध रोगनिदान मार्गदर्शक / तक्ते रोगनिदान मार्गदर्शक