Jump to content

आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान
मैदान माहिती
स्थान बँकॉक
स्थापना २००६
मालक आशियाई तंत्रज्ञान संस्था
प्रचालक आशियाई तंत्रज्ञान संस्था
यजमान थायलंड क्रिकेट संघ

शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान हे बँकॉक, थायलंड मधील एक महाविद्यालयीन मैदान आहे. मैदानाचे मालकी हक्क आशियाई तंत्रज्ञान संस्थेकडे आहेत. थायलंड क्रिकेट लीग स्पर्धेचे सामने जेथे होतात अशा तीन पैकी एक मैदान म्हणजे हे मैदान आहे. आशियाई तंत्रज्ञान संस्था क्रिकेट संघाने मागील तीन वर्षात दोन वेळा बँकॉक क्रिकेट लीग 'अ' विभागाचे विजेतेपद पटकावले आहे.[१][२]

येथे ९-खळग्यांचे गोल्फचे मैदान आणि जलतरण तलाव सुद्धा आहे. तसेच संस्थेच्या आवारात बॅडमिंटन, टकरॉ, टेबल टेनिस, टेनिस, बास्केटबॉल, क्रिकेट, व्हॉलिबॉल आणि जलतणाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

२०१५ मध्ये, महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता स्पर्धेसाठी थायलंड क्रिकेट मैदानाबरोबर आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदानाला यजमानपद देण्यात आले.[३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ थायलंड प्रीमियर लीग
  2. ^ "बँकॉक क्रिकेट लीग". Archived from the original on 2016-12-20. 2017-02-22 रोजी पाहिले.
  3. ^ आशियाई तंत्रज्ञान संस्था