Jump to content

उकड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उकड[संपादन]

वाढणी: २ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस

खूप आंबट ताक १ मोठा ग्लास भरुन, तांदुळाचे पीठ, हिरव्या तिखट मिरच्या ३-४, तेल, मोहोरी,हिंग,हळद,

क्रमवार मार्गदर्शन:

तेलाची फोडणी करून त्यात ३-४ हिरव्या तिखट मिरच्या चिरून घालणे. नंतर त्यात ताक आणि चवीपुरते मीठ घालून ढवळणे. ताक खूप दाट नसावे. गॅस मोठा करून ताक उकळून द्यावे. उकळी आली की एकीकडे तांदुळाचे पीठ घालत राहाणे, व त्याच वेळी एकीकडे कालथ्याने भराभर ढवळणे. गोळा होण्याइतपतच तांदुळाचे पीठ घालणे, जास्ती पीठ नको. आणि पीठाची गूठळी न होण्याबद्दल काळजी घेणे. नंतर गॅस बारीक करून १-२ वेळा वाफेवर शिजवणे.

खायला देताना खोलगट डीशमधे उकड घालून त्यावर कच्चे तेल५-६ चमचे घालून देणे. कच्चे तेल जितके जास्ती घालू तितके ते उकडीमधे मुरते व चवीला चांगली लागते. गरम गरम उकड खाताना बरोबर पांढऱ्या कांद्याचे काप खायला विसरु नये.

माहितीचा स्रोत: मनोगत आस्वाद