Jump to content

काशीनाथ नारायण साने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काशिनाथ नारायण साने
जन्म नाव काशिनाथ नारायण साने
टोपणनाव बाबासाहेब
जन्म २५ सप्टेंबर, इ.स. १८५१
मृत्यू १७ मार्च, १९२७ (वय ७५)
कार्यक्षेत्र इतिहास, मराठी साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास, काव्य
प्रसिद्ध साहित्यकृती काव्येतिहास-संग्रह मासिक
सभासद बखर
वडील नारायण साने

राव बहादूर काशिनाथ नारायण साने उर्फ का.ना. साने (२५ सप्टेंबर, १८५१ - १७ मार्च, १९२७) हे काव्येतिहास-संग्रह मासिकाचे संपादक होते. साने इतिहास अभ्यासक व पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष होते.

पूर्वायुष्य[संपादन]

सानेंनी पुण्याच्या डेक्कन काॅलेज मधून १८७३ साली बी.ए.ची पदवी संपादन केली व नंतर महसूल खात्यात प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्याने शिक्षण खात्यात नोकरी पत्करली. तेथे त्यांनी उप शिक्षण अधिकारी, ट्रेनिंग काॅलेज , पुणे येथे उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक तसेच पुणे, बेळगाव येथे हेडमास्तर इत्यादी पदांवर कार्यरत होते. १९०८ साली मुख्य शिक्षण अधिकारी पदावरून डावलल्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. दीर्घकाळ प्रामाणिकपणे नोकरी केल्यामुळे इंग्लंडच्या पंचम जाॅर्ज बादशहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरकारने सानेंना रावबहादूर हा किताब बहाल केला.[१]

इतिहासविषयक कार्य[संपादन]

शिक्षण खात्यात नोकरीला असताना सानेंना जुने ग्रंथ , बखरी जमविण्याचा नाद लागला. नोकरीच्या निमित्ताने मुंबई इलाख्यातील अनेक शाळांना भेटी देण्यासाठी भ्रमण करावे लागे. ह्यामुळे निरनिराळ्या गावांतून कागदपत्रे, ग्रंथ, पोथ्या मिळवणे त्यांना शक्य झाले.

१८७८ साली का. ना. सानेंनी विष्णूशास्त्री चिपळूणकरजनार्दन बाळाजी मोडक यांच्यासह काव्येतिहास-संग्रह नावाचे मासिक सुरू केले.[२] ह्या मासिकात मराठी काव्य, संस्कृत काव्य व मराठी बखरी , कागदपत्रे ह्यात प्रसिद्ध होत असे. काव्येतिहास संग्रहातील ऐतिहासिक साहित्याची जबाबदारी सानेची होती , तर संस्कृत व मराठी काव्याची जबाबदारी अनुक्रमे चिपळूणकर आणि मोडक यांची होती.

१८७८ ते १८८८ असे अकरा वर्ष काव्येतिहास संग्रह मासिक सुरू होते. ह्या मासिकातून २२ ऐतिहासिक ग्रंथ, ५०१ ऐतिहासिक कागदपत्रे, १९ संस्कृत ग्रंथ व १० मराठी काव्य संग्रह प्रकाशित झाले.[३] हे मासिक बंद झाल्यावरही सानेंचे इतिहास कार्य सुरू होते. सानेंनी मासिकात छापलेल्या बखरी स्वतंत्रपणे व कागदपत्रांचे एकत्र संपादन करून ग्रंथरूपाने प्रकाशित केले. साने १९१३ ते १९२६ पर्यंत भारत इतिहास संशोधक मंडळ ह्या पुण्यातील संस्थेचे अध्यक्ष होते.

ग्रंथसंपदा[संपादन]


इतर[संपादन]

  • मराठ्यांच्या इतिहासाची साधने, रा.का.ना.साने ह्यांचे वसंत व्याख्यानमालेतील १८९६ चे व्याख्यान - संपादक : डॉ.विद्यागौरी टिळक, डॉ. अंजली जोशी , पद्मगंधा प्रकाशन, पुणे , २०**

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ कुलकर्णी, अ.रा. (२०११). मराठ्यांचे इतिहासकार. डायमंड पब्लिकेशन्स. pp. Page १२८-१२९. ISBN 978-81-8483-359-1.
  2. ^ मोडक, ज.बा (१८७८). काव्येतिहास संग्रह पुस्तक १ अंक १ , जानेवारी १८७८. pp. Page १.
  3. ^ कुलकर्णी, अ.रा. (२०११). मराठ्यांचे इतिहासकार. डायमंड पब्लिकेशन्स. pp. Page १२९. ISBN 978-81-8483-359-1.