Jump to content

केंद्रीय जल आयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केंद्रीय जल आयोग (इंग्रजीत सेन्ट्रल वॉटर कमिशन) ही नवी दिल्ली स्थित संस्था देशातील जल स्रोतांच्या क्षेत्रातील एक तंत्रज्ञान विषयक मुख्य सरकारी संस्था आहे. पूर नियंत्रण, सिंचन, पेयजल पुरवठा आणि जल विद्युत विकास या गोष्टींसाठी संबंधित राज्य सरकारांशी विचार विनिमय करून संपूर्ण देशातील जल स्रोतांचे नियंत्रण, संरक्षण या संस्थेमार्फत केले जाते. तसेच जल स्रोतांच्या उपयोगासाठी नवीन योजना सुरू करणे, त्यांचे समन्वयन करण्यासाठी सुद्धा ही संस्था जबाबदार आहे.

संस्थेची मुख्य कार्ये[संपादन]

  • नद्यांच्या खोऱ्यांच्या विकासासाठी सर्वेक्षण, तपासणी आणि योजना तयार करणे.
  • जल स्रोत परीयोजनांचे तांत्रिक-आर्थिक मूल्यांकन
  • राज्याराज्यातील जल वाटप/ विवाद याच्याशी संबंधित गोष्टी
  • जल स्रोत क्षेत्रात सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर
  • परीयोजनांचा विस्तृत जल वैज्ञानिक अभ्यास
  • पूर प्रतिबंध आणि पूर पूर्वानुमान प्रणालीचा विकास आणि वापर
  • सध्या असलेल्या धरणांच्या सुरक्षेचा अभ्यास, त्याबद्दल सूचना जारी करणे
  • संशोधन आणि विकास कार्यात समन्वयन

देशातील महत्त्वाच्या जलस्रोतातील पाणी साठ्याची आकडेवारी या संस्थेतर्फे प्रत्येक आठवड्याला जाहीर केली जाते.

संदर्भ सूची[संपादन]

केंद्रीय जल आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ [१]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2018-02-02. 2017-12-08 रोजी पाहिले.