Jump to content

कोरियन एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोरियन एअर
आय.ए.टी.ए.
KE
आय.सी.ए.ओ.
KAL
कॉलसाईन
KOREANAIR
स्थापना १९४६ (कोरियन नॅशनल एअरलाइन्स)
हब इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ, गिम्पो विमानतळ (आता बंद)
मुख्य शहरे बुसान, जेजू, ओसाका
फ्रिक्वेंट फ्लायर स्कायपास
अलायन्स स्कायटीम
विमान संख्या १४८
मुख्यालय सोल
संकेतस्थळ http://www.koreanair.com
तुलूझ विमानतळावर पहिल्या एरबस ए३८०चा ताबा घेताना कोरियन एअर

कोरियन एर (कोरियन: 대한항공) ही दक्षिण कोरिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९६२ साली कोरियन सरकारने कोरियन नॅशनल एरलाइन्स ह्या कंपनीचे रूपांतर कोरियन एर मध्ये करण्याचा निर्णय घेतला.

सध्या जगातील ११६ मोठ्या शहरांमध्ये कोरियन एर प्रवासीवाहतूक व मालवाहतूक करते. जगातील सर्व सहा खंडांपर्यंत पोचणाऱ्या काही निवडक विमानकंपन्यांपैकी कोरियन एर एक आहे. २०१२ साली कोरियन एरला आशियामधील सर्वोत्तम विमानसेवेचा पुरस्कार मिळाला.

देश व शहरे[संपादन]

देश शहर
ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन, सिडनी
ऑस्ट्रिया व्हिएन्ना
बेल्जियम ब्रुसेल्स
बांग्लादेश डाक्का
ब्राझील काम्पिनास, साओ पाउलो
कॅनडा टोरॉंटो, व्हॅंकुव्हर
कंबोडिया पनॉम पेन, सीम रीप
चीन बीजिंग, क्वांगचौ, शांघाय, छांग्षा, छंतू, ताल्येन, हांगचौ, चीनान, कुन्मिंग, नांजिंग, चिंगदाओ, षन्यांग, शेन्झेन, त्यांजिन, उरुम्छी, वुहान, चंचौ, शीआन, च्यामेन
क्रोएशिया झाग्रेब
चेक प्रजासत्ताक प्राग
डेन्मार्क कोपनहेगन
इजिप्त कैरो
फिजी नंदी
फ्रान्स पॅरिस (चार्ल्स डी गॉल)
जर्मनी फ्रॅंकफुर्ट (फ्रॅंकफुर्ट विमानतळ)
ग्वॉम हेगात्न्या
हाँग काँग हॉंगकॉंग (हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ)
भारत मुंबई (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ), चेन्नई, (चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
इंडोनेशिया जाकार्ता, देनपसार
इस्रायल तेल अवीव
इटली मिलान, रोम
जपान अकिता, ओमोरी, ओसाका, फुकुओका, कागोशिमा, नागोया, निगाता, ओइता, ओकायामा, सप्पोरो, शिझुओका, तोक्यो (नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ)
केन्या नैरोबी
मलेशिया क्वालालंपूर, कोटा किनाबालू, पेनांग
मालदीव माले
मंगोलिया उलानबातर
म्यानमार रंगून
नेपाळ काठमांडू
नेदरलँड्स अ‍ॅम्स्टरडॅम
न्यू झीलंड ऑकलंड
नॉर्वे ओस्लो
पलाउ कोरोर
पेरू लिमा
फिलिपिन्स मनिला, सेबू
रशिया मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, इरकुत्स्क, व्लादिवोस्तॉक
सौदी अरेबिया जेद्दाह, रियाध
सिंगापूर सिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ)
दक्षिण कोरिया सोल, बुसान, दैगू, चॉंगजू, ग्वांग्जू, गुन्सान, जेजू, उल्सान
स्पेन बार्सिलोना, माद्रिद, सारागोसा
श्री लंका कोलंबो
स्वीडन स्टॉकहोम
स्वित्झर्लंड झ्युरिक
तैवान तैपै
थायलंड बँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ), फुकेत, च्यांग माई
तुर्कस्तान इस्तंबूल
संयुक्त अरब अमिराती दुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
युनायटेड किंग्डम लंडन (लंडन-हीथ्रो)
अमेरिका अटलांटा (हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ), बॉस्टन (बॉस्टन विमानतळ), शिकागो (शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ), डॅलस, होनोलुलु, लास व्हेगास, लॉस एंजेल्स, मायामी, न्यू यॉर्क शहर (जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ), सॅन फ्रान्सिस्को, सिॲटल, वॉशिंग्टन, डी.सी. (वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ)
उझबेकिस्तान नावोयी, ताश्कंद
व्हियेतनाम हो चि मिन्ह सिटी, हनोई, दा नांग

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत