Jump to content

गोविंद गोपाळ गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोविंद गोपाळ गायकवाड वढू (बु.) येथील सैनिक होते. ते जातीने महार होते त्यामुळे त्यांचा उल्लेख गोविंद गोपाळ महार असाही केला जातो. औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतःस्ततः फेकून दिले होते. त्या तुकड्यांना एकत्र करून गोविंद गोपाळ गायकवाड यांनी त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील वढू (बु.) येथे अंत्यसंस्कार केले. त्याच जागेवर संभाजी महाराजांची समाधी उभी केलेली आहे. त्या गावात गोविंद गायकवाडांची समाधी आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2019-01-01. 2018-12-31 रोजी पाहिले.