Jump to content

चर्चा:कॅथोलिक चर्चचे पवित्र साक्रामेंट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख पूर्णपणे ईस्ट इंडियन बोलीभाषेत असू नये. साक्रामेंटबद्दलची माहिती मराठीत असणे आवश्यक आहे. साक्रामेंट तसेच चर्च मधील इतर बाबी नक्कीच ईस्ट इंडियन बोलीभाषेत असाव्यात.

अभय नातू (चर्चा) २२:५६, २५ जानेवारी २०१७ (IST)[reply]

  • सदर लेख प्रमाण मराठी भाषेत नसल्यामुळे. मराठी भाषिकास समजण्यास कठीण आहे. त्या हा लेख बोली भाषेतून प्रमाण भाषेत दुरुस्त करावा. प्रसाद साळवे १६:५४, २८ जानेवारी २०१७ (IST)
विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा#मराठी विकिपीडियावर बोलीभाषेतील लेखन --टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:३८, २८ जानेवारी २०१७ (IST)[reply]
पुन्हा एकदा नम्र विनंती की या लेखाची प्रस्तावना व साक्रामेंट बद्दलची माहिती मराठीत असणे आवश्यक आहे.
साक्रामेंटमधील विधी, वाक्ये ही ईस्ट इंडियन बोलीभाषेत जरुर असाव्यात. या वाक्यांचा अर्थ देणे योग्य वाटल्यास तेथेही काही प्रमाणात ईस्ट इंडियन बोलीभाषेचा वापर गरजेचा आहे असे वाटते.
अभय नातू (चर्चा) ००:४०, २९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
वर लिहिल्याचे उदाहरण मी एका संपादनात दाखवले आहे. लेखातील काटलेला मजकूर सध्या मुद्दाम ठेवला आहे ज्यायोगे तुम्हाला माझ्या संपादनाचा रोख कळेल.
या संपादनाद्वारे -
  1. साक्रामेंटबद्दलची माहिती अबाधित आहे.
  2. ही माहिती मराठी वाचकासही वाचण्यासाठी सोपी आहे.
  3. जेथे ईस्ट इंडियन बोलीभाषा आवश्यक आहे ती तशीच आहे.
आशा आहे की आपण (सगळेच) अशी संपादने करून अधिकाधिक माहिती येथे वाढवूयात. जर ही माहिती फक्त मराठीत ठेवली तर ईस्ट इंडियन समुदायाची (जे महाराष्ट्राचा/मराठी लोकांचा भागच आहेत) माहिती स्पष्ट होणार नाही. त्याच वेळी फक्त ईस्ट इंडियन बोलीभाषेत ठेवली तर सर्वसाधारण मराठी वाचकास ती कळणार नाही.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ००:५१, २९ जानेवारी २०१७ (IST)[reply]
  • मुंबई वर्गा बद्दल माहिती दिल्या बद्दल :@अभय नातू: आभार. लेखात फक्त मुंबई उपनगरातील शहरांचा उलेख दिसतो. ईस्ट इंडियन समूहा हा कोकण किनार पट्टी आढळतो. तसेच सदर लेखात प्रमाण मराठी नसल्यामुळे तो समजण्यास कठीण हा लेख प्रमाण मराठीत नसेल तर तो इस्ट इंडिअन लोकांसाठीच आहे असे होईल. इस्ट इंडिअन म्हणजे बोलीभाषा म्हणजे प्रमाण मराठी नव्हे तसेच हा लेख इस्ट इंडियन समूहाची मक्तेदारी होऊ शकत नाही कि ज्यात काही बदल केला जाऊ शकत नाही..? कारण सदस्य:Tiven2240 मी या लेखात केलेली संपादने वारंवार उलटवत आहेत. संपादक त्या समूहाचा आहे असे वारंवार सांगतात म्हणून त्यात बदल करू नये काय ? बोलीभाषेबाबत आदर ठेवत बोली भाषे कडून प्रमाण भाषेकडे असे सूत्र असावे. लेखातील १. बाप्तिस्मा प्रकारात केलेल्याबदलाशी मी सहमत आहे, "छायाचित्राचे शीर्षक दुरुस्त करावे” असाच बदल संपूर्ण लेखात केला जावा. प्रसाद साळवे Salveramprasad (चर्चा) १२:४९, २९ जानेवारी २०१७ (IST)[reply]

मला अभिप्रेत पद्धती[संपादन]

मी चावडी:इतर चर्चात प्रत्यक्ष उदाहरण न जोडल्यामुळे मी मला अभिप्रेत पद्धती सांगण्यात कुठे तरी कमी पडलो असे समजून एक उदाहरण पुन्हा खाली देतो.


१) लेख मराठीच रहावा.

२) तळाशी खालील प्रमाणे दाखवा लपवा साचे असावेत ज्यात बोली भाषेतील अनुवाद असावा.


कॅथोलिक धर्मानुसार चर्चची (देवळाची) सात पवित्र साक्रामेंट आहेत. ही येशू ख्रिस्ताने ठरवली व चर्चला दिली. ही साक्रामेंट चर्चमधील प्रथा आहेत व सगळे कॅथोलिक याचे पालन करतात. बाप्तिस्मा हा विधी (साक्रामेंट) ही ख्रिस्ती जीवनाची सुरुवात समजली जाते.

यास इंग्लिशमध्ये बॅप्टिझम म्हणतात. मुला किंवा मुलीचा जन्म झाल्यावर २-३ आठवड्यांनी चर्चेमध्ये पादरी त्याच्या किंवा तिच्या डोक्यावर तीन वेळा पवित्र पाणी शिंपडतात व मी तुला बावतीसमा देताय बापाचे, पुत्राचे अनी स्प्रिंट संतांचे. असे म्हणतात. हा विधी बायबलमधील नव्या करारात असलेल्या मत्तय (मॅथ्यू) (२८:१९) या चॅप्टर/व्हर्सच्या अनुसार आहे.

लेखाच्या तळाशी पहिल्या -दोन ते तीन परिच्छेदांचे बोलीभाषेतील अनुवाद[संपादन]

* हा लेख विभाग ईस्ट इंडियन या मराठी बोलीमध्ये आहे. जी प्रमाण मराठी भाषेपासून वेगळी आहे. यात संपादन करण्यापूर्वी ईस्ट इंडियन बोलीभाषेची समज असणे अभिप्रेत आहे.

क्रीस्ती देवळान सात सैक्रमन्ट हान.ती जेसुस द्वारा चालू केली गेली आणि देवळाला दिलं गेलं. सैक्रमन्ट देवळाची प्रता हाय वह सगळी ख्रिस्ती याचा पालन करतात. बावतीस यह क्रीस्ती जीवनाची सुरवात हाय.याला इंग्लिशमनी बेप्तीसम बोलतान. बावतीस जव्हँ पोर जल्मत त्याचे 2-3 हाफतेचे माक्षी होतं. देवळांन पदरी पोराचे डोक्यावर्षी 3 टाइम पवित्र पाणी घालून बोलते मी तुला बावतीसमा देताय बापाचे, पुत्राचे अनी स्प्रिंट संतांचे मत्तय २८:१९

असे एका खाली एक वेगवेगळ्या मराठी बोलीभाषातील अनुवाद असावेत. (उद्देश्य किमान विषयाची तोंड ओळख स्वत:च्या मातृबोलीतून करुन घेण्याची संधी वाचकांना मिळावी. मातृभाषेतून/बोलीतून विषय समजणे अधिक सोपे जाते असे म्हणतात.

आता हे जे दाखवा लपवा साचात आहे तो मजकुरसुद्धा शक्यतोवर वेगळ्या बोलीमराठी नामविश्वातून यावा म्हणजे लेखशीर्षकाचा साचा लावला म्हणजे काम होते. नामविश्व वेगळे असले म्हणजे बॉट्स आणि संपादन गाळण्या कमीत कमी फाल्स पॉझीटीव्हजने आणि जास्त इफेक्टीव्हली काम करु शकतील.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३३, २९ जानेवारी २०१७ (IST)[reply]