Jump to content

चर्चा:मौर्य (निःसंदिग्धीकरण)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@संदेश हिवाळे:

या पानाच्या पुर्ननिर्देशनामागचा आपला दृष्टीकोण लक्षात नाही आला. एकाचा नावाच्या अनेक गोष्टी, व्यक्ति स्थळे असतात त्या नावांचे आपापसात कन्फ्यूजन होऊ नये गोंधळ टळावा म्हणून सर्वसाधारण पणे निःसंदिग्धीकरण पानांची रचना असते. उदाहरणार्थ शाहू महाराज म्हटले कि एक किंवा दोनच शाहू महाराज आठवतात पण शाहू हे नाव अधिक व्यक्तिंसाठी वापरले गेले आहे. उदाहरणासाठी शाहू (निःसंदिग्धीकरण) पान पहावे. संभाजी भोसले म्हटले कि शिवाजी महाराजांच्या युवराजांचे नाव दिसते पण त्यांच्या आधीच्या पिढीतही संभाजीराजे नावाची व्यक्ति होती हे चटकन लक्षात येत नाही. मग गोंधळ होऊ शकतो.

जसे मौर्य हे नाव ऐतिहासिक मौर्य राजघराण्या पासून ते अलिकडील उदयलाल मौर्य किंवा नीरज (कुशवाहा) मौर्य अशा प्रकारच्या नावांच्या अनेक विधान सभा लोकसभा सदस्याचेही असू शकते. मौर्य एक्स्प्रेस नावाच्या ट्रेन पण आहेत अशी सगळी नावे एका ठिकाणी देता यावीत हा निःसंदिग्धीकरण पानाचा उद्देश असतो ह्याची आपल्याला कल्पना असेल. कदाचित काही वेगळ्या दृष्टीकोणातून आपण ह्या पुर्ननिर्देशनाचा विचार केला असल्यास कळवावे हि विनंती.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:३२, ८ एप्रिल २०१७ (IST)[reply]

@Mahitgar: सर, या लेखात केवळ ‘मौर्य वंश’ आणि ‘मौर्य साम्राज्य’ या दोन लेखांची नावे होती, मौर्य वंश लेख हा खूपच लहान व मौर्य साम्राज्यात मोडणारा होता म्हणून त्याला तिथे पुनर्निर्देशन केले. मग मौर्य (निःसंदिग्धीकरण) यात केवळ एकच लेख मौर्य साम्राज्य शिल्लक राहला होता. मौर्य (निःसंदिग्धीकरण) यात केवल मौर्य साम्राज्य लेख राहिल्यामुळे मी त्याला प्रत्यक्ष मौर्य साम्राज्य ला जोडले. तुम्ही वर सांगितल्या प्रमाणे 'मौर्य' नावाच्या दोन राजकिय व्यक्ती व ट्रेन सुद्धा आहे, परंतु लेखात त्यांचा उल्लेख नसल्याने माझ्याकडून हा लेख चूकीने पुनर्निर्देशित करण्यात आला, क्षमा असावी. जर मौर्य (निःसंदिग्धीकरण) यात मौर्य साम्राज्य खेरीज अन्य नावे असती तर हा लेख पुनर्निर्देशित केलाच नसता. कृपया, ह्या लेखात मौर्य साम्राज्य, वरील दोन व्यक्ती, ट्रेनचे नाव व इतर मौर्य संबंधी लेख नावे लिहा. मी पुनर्निर्देशन हटवले आहे व मौर्य साम्राज्य एक नाव ही जोडले आहे, त्यात बाकी बर तुम्ही घाला. संदेश हिवाळे (चर्चा) १७:१८, ९ एप्रिल २०१७ (IST)[reply]


धन्यवाद, भर घातल्या नंतर आणखी बरीच नावे वाढली. मौर्य घराणे बिहार मधील होते पण नवीन काळात मौर्य आडनावाच्या अधिकतर व्यक्ती उत्तरप्रदेशमध्ये दिसतात. मौर्य टिव्ही वगैरे सुद्धा आहे असे दिसते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:१४, ११ एप्रिल २०१७ (IST)[reply]