Jump to content

चर्चा:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देश विघातक आणि जातीय कारवाया करणाऱ्या संघटना[संपादन]

देश विघातक आणि जातीय कारवाया करणाऱ्या संघटनेच्या प्रचाराचे काम विकिपीडिया मार्फत करू नका. हा लेख त्वरित काढा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जातीयवादी संघटना आहे. भारतासाठी अत्यंत घातक अशा ब्राह्मणी वर्चस्ववादाचा पुरस्कार करते. या लेखात संघ प्रेरणेतून निर्माण झालेल्या काही संघटनांची नावे दिली आहेत. त्यातील बहुतांश संघटना भारतातील जातीय दंगलीत गुंतलेल्या आहेत. उदा. अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यामध्ये तसेच गुजरातमधील जातीय दंगलींमध्ये या संघटनांचा हात होता. अयोध्येतील मशिद पाडल्यानंतर भारतात ठिकठिकाणी उसळलेल्या दंगलीत काही हजार लोक मारले गेले तसेच गुजरात दंगलीत ३ हजार मुसलमान मारले गेले, हे सर्वश्रुत आहेच. अशा जातीय संघटनेचा विकीपीडियावर उदोउदो करण्यात येऊ नये. विकिपीडियावर काही ब्राह्मणवादी तसेच संघाचे प्रचारक शिरले आहेत. त्यांना त्वरीत रोखण्यात यावे, ही माझी प्रचालक/प्रबंधकांना नम्र विनंती आहे. - brurthari (चर्चा) १७:०२, ३१ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

चर्चा[संपादन]

नमस्कार,

येथे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी विकिपीडियावरील लेखांवर उल्लेखनीयतेबद्दलचे साचे लावण्यापेक्षा अरुण शौरी सारख्या लेखांत भर घातली तर विकिपीडियाचे भले होईल.

चर्चा/वाद करताना लक्षात ठेवावे --

१. निरर्थक जातीयवादाचा मुद्दा करू नये नये. प्रत्येकास असेच वाटते की माझ्यावर/माझ्या समाजावर सारखाच अन्याय होत असतो. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी विकिपीडिया हा मंच नव्हे.

२. सदस्यांसाठीचे संदेश त्यांच्या चर्चा पानावर लावावे. कारण नसताना लेखांच्या चर्चा पानांवर लावू नये.

३. विकिपीडिया हा माहितीसंग्रह आहे. वैचारिक हाणामारी करण्याची जागा नव्हे.

४. वाद विकोपाला जात असल्यास दोन-तीन दिवस विकिसुट्टी घेउन मग पुन्हा चर्चेस हात घालावा. याने विनाकारण निर्माण होणारी कटुता कमी होण्यास मदत होते.

वरील संदेश फक्त येथे चर्चा करणाऱ्यांसाठीच नसून सगळ्यांसाठी आहे.

अभय नातू (चर्चा) २१:१८, २५ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

उल्लेखनीय व दखलपात्रही[संपादन]

रा. स्व. संघ उल्लेखनीय व दखलपात्र आहेच. ज्या कारणांसाठी हा लेख काढून टाकावा असे म्हटले गेले आहे, ते पाहता निरपेक्षदृष्ट्या त्याची उल्लेखनीयता, दखलपात्रता कैकपटींनी वाढते.