Jump to content

चिकलठाणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिकलठाणा हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य या शहराचा पूर्वेकडील एक उपनगरीय विभाग आहे. चिकलठाणा येथे औरंगाबाद विमानतळ आहे.

चिकलठाणा येथे जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय आहे. तसेच दर शुक्रवारी चिकलठाणा येथे आठवडी बाजार भरतो. आजुबाजुच्या ४०-५० गावातील व्यापारी व ग्राहक येथे खरेदी विक्री साठी येतात.