Jump to content

चौथा चामराज वोडेयार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चौथा चामराज वोडेयार
मैसुरुचा सातवा राजा
अधिकारकाळ १५७२ - ९ नोव्हेंबर, १५७६
अधिकारारोहण १५७२
राज्याभिषेक १५७२
राजधानी मैसुरु
पदव्या महा मंडलेश्वर बिरुद-अंतेंबरा-गंदा राजा हिरिया बोला चामराज वोडेयार
जन्म २५ जुलै, १५०७
मृत्यू ९ नोव्हेंबर, १५७६
पूर्वाधिकारी दुसरा तिम्मराज वोडेयार (भाऊ)
' पाचवा चामराज वोडेयार (पुतण्या)
उत्तराधिकारी पाचवा चामराज वोडेयार (पुतण्या)
वडील दुसरा तिम्मराज वोडेयार
संतती पहिला राज वोडेयार
धर्म हिंदू

चौथा चामराजा वोडेयार (२५ जुलै, १५०७ - ९ नोव्हेंबर, १५७६) हा मैसुरुचा वडियार घराण्याचा सातवा राजा होता. हा मैसुरुचा पाचवा राजा तिसऱ्या चामराज वोडेयारचा याचा सर्वात धाकटा मुलगा होता. १५७२ मध्ये दुसरा तिम्मराज या आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर वयाच्या ६५ व्या वर्षी त्याने राज्य हाती घेतले आणि १५७६पर्यंत चार वर्षे राज्य केले.

सार्वभौमत्व[संपादन]

दुसऱ्या तिम्मराजाने मैसुरुला विजयनगर साम्राज्यापासून स्वतंत्र घोषित केले असले तरी त्याला मान्यता मिळालेली नव्हती. चौथ्या चामराजाने सत्ता हाती घेतल्याबरोबर मैसुरु राज्यातून विजयनगरचे राजदूत आणि देशमुख, देशपांड्यांना हाकलून दिले. जरी त्याला श्रीरंगपट्टणातील विजयनगरचे एक छोटे प्रतिनिधी मंडळ कायम ठेवावे लागले असले तरी, त्याने विजयनगरच्या इतर सर्व अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली.

याच्या डोक्यावर वीज पडल्याने त्याला टक्कल पडले होते. त्यामुळे त्याला बोला (टकल्या) असेही म्हणत.

बेंगलुरु[संपादन]

चौथ्या चामराजाच्या जन्माच्या आसपास पहिल्या केम्पे गौडाने मैसुरुच्या पूर्वेस एका टेकाडावर छोटे शहर वसवले होते व तेथे आपले राज्य स्थापले होते. लहान असताना चामराजने केम्पे गौडाच्या आणि बेंगलुरु शहराच्या शौर्यगाथा ऐकल्या होत्या. कदाचित त्यामुळेच १५६९मध्ये मध्ये केम्पे गौडाच्या मृत्यूनंतर चामराजाने बेंगलुरुवर चढाई करून काबीज करून घेतले.

९ नोव्हेंबर, १५७६ रोजी चौथ्या चामराजाचा मृत्यू झाला आणि त्याचा पुतण्या पाचवा चामराजा सिंहासनावर आला.