Jump to content

जगजीवन राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाबू जगजीवन राम (एप्रिल ५, इ.स. १९०८ - जुलै ६, इ.स. १९८६) हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री (इ.स. १९४७ ते इ.स. १९८०)राहायचा मान त्यांना मिळाला. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री,कृषीमंत्री,रेल्वेमंत्री,संरक्षणमंत्री आणि दूरसंचारमंत्री ही पदे भूषविली. ते बिहार राज्यातील सासाराम लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५२,इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये निवडून आले.