Jump to content

जिब्राल्टरची सामुद्रधुनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिब्राल्टरची सामुद्रधुनी, डावीकडे स्पेन तर उजवीकडे मोरोक्को दिसत आहे
जिब्राल्टरची सामुद्रधुनी, डावीकडे स्पेन तर उजवीकडे मोरोक्को दिसत आहे

स्पेनमोरोक्को या देशांमधील चिंचोळ्या सामुद्रधुनीला जिब्राल्टरची सामुद्रधुनी असे म्हणतात. जिब्राल्टर हे नाव ज्याने सर्वप्रथम स्पेन काबीज केला त्या ८ व्या शतकातील अरबी सेनापती तारिक त्याच्या नावावरून पडले आहे. या चिंचोळ्या सामुद्रधुनीला या आधी ग्रीक व रोमन नोंदींनुसार हर्क्युलचे द्वार असे संबोधत. तारिकने स्पेन काबीज करायला मोरोक्कोमधून आक्रमण केले. अरबी लोकांनी याचे नामकरण जेबेल ए तारिक ( तारिकचा दगड) असे केले व नंतर ते स्पॅनिश लोकांनी त्याचा जिब्राल्टर असा अपभ्रंश केला.