Jump to content

तावडी बोलीभाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तावडी बोली ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा व जामनेर तालुक्यात अजिंठा डोंगररांगांकडील प्रदेशात बोलली जाते.

तावडी बोली
प्रदेश जळगाव जिल्हा
भाषाकुळ
हिंद-युरोपीय
लिपी देवनागरी
भाषा संकेत
ISO ६३९-३ -

उच्चार प्रक्रियेतील भाषिक काटकसर[संपादन]

कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याकडे तावडी बोलीचा कल आहे. जसे आल्ता(आला होता), गेल्ता (गेला होता), कुढलोंग (कुठपर्यंत), कव्हाचा (केव्हापासूनचा), तढ़लोंग (तिथपर्यंत), आढ़लोंग (इथपर्यंत), पहाल्ता (पाहिला होता), राहल्ता (राहिला होता), झाल्ता (झाला होता) इत्यादी.