दालन:क्रीडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


क्रीडा

क्रिडा आणि खेळ
क्रिडा आणि खेळ

क्रीडा म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे (किंवा संघापरत्वे) कुशलता किंवा हेतू मनात ठेवून करण्यामुळे उद्भवू शकतात.

विशेष लेख

२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचे मानचिह्न
२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचे मानचिह्न

२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. स्पेनने अंतिम सामन्यात नेदरलँड्सवर १-० ने मात करून विजेतेपद मिळवले.

स्पर्धेतील प्रत्येक संघाला सामने सुरू होण्याआधीच १० लक्ष अमेरिकन डॉलर देण्यात आले. साखळी सामन्यांनंतर बाहेर पडलेल्या संघांना प्रत्येकी ८० लाख डॉलर मिळाले. झाकुमी हा १५ वर्षे वयाचा मानवसदृश चित्ता २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा प्रतिनिधी होता. अदिदास या कंपनीने तयार केलेला जबुलानी हा चेंडू स्पर्धेत वापरण्यात आला. इसिझुलू भाषेत जबुलानीचा अर्थ सगळ्यांना आनंदित करणारा असा होतो.

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू सिफिवे शबलल याने स्पर्धेतील पहिला गोल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मेक्सिको (१-१) विरूध्द केला. स्पर्धेतील पहिला स्व गोल नेदरलँड्स (०-२) विरूध्दच्या सामन्यात डॅनिश मिडफिल्डर डॅनियल एगरकडून झाला. आर्जेंटिनाचा स्ट्रायकर गोंझालो हिगुएन याने स्पर्धेतील सर्वप्रथम हॅट्रीक दक्षिण कोरिया (४-१) विरूध्द केली. पुढे वाचा...

क्रीडेवर एक प्रकाशझोत

  • खेळ -कबड्डी
  • आंतरराष्ट्रीय संघटन -
  • खेळणारे देश - ३१
  • महत्वाच्या स्पर्धा - कबड्डी विश्वचषक, आशियाई स्पर्धा

कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक भिडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.

महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जायचा. इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.

अधिक माहिती..



बदला


स्टार खेळाडू

मायकल फेल्प्स(अमेरिका)
मायकल फ्रेड फेल्प्स (इंग्लिश: Michael Fred Phelps) (३० जून, १९८५ - हयात) हा एक अमेरिकन जलतरणपटू आहे. त्याला जगातील सर्वश्रेष्ठ जलतरणपटू मानले जाते. त्याने आतापर्यंत ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकूण १४ सुवर्णपदके जिंकली आहेत. इ.स. २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने ८ सुवर्णपदके पटकावली. त्याने जलतरण स्पर्धांमध्ये आजवर एकूण ३१ विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत.त्याच्या अद्वितीय विक्रमांमुळे त्याला इ.स. २००३, इ.स. २००४, इ.स. २००६, इ.स. २००७ आणि इ.स. २००८ सालांमध्ये वर्षातील जागतिक जलतरणपटू हा पुरस्कार मिळाला आहे.
कारकिर्द
खेळ सुवर्ण रजत कास्य विश्वविक्रम
जलतरण १४ ३८

सद्य क्रीडा स्पर्धा

Gola fek

-->

सद्य क्रिकेट स्पर्धा
सद्य हॉकी स्पर्धा‎
सद्य इतर स्पर्धा

gola fek

आपणास माहिती आहे का?

• १९९६ हे आधुनिक ऑलिम्पिकचे शताब्दी वर्ष होय.

• जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान अहमदाबाद येथे आहे.

• क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय खेळाडू रणजितसिंग हे होय.

श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन हा कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू आहे.

बुद्धीबळाची सुरवात भारतात झाली.

• ऑस्ट्रेलियाने सलग सोळा कसोटी सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला.

• कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक नोंदवणारा पहिला भारतीय खेळाडू हरभजनसिंग हा होय.

सुनील गावसकर एक दिवसीय क्रिकेट मध्ये सात वेळा शून्यावर बाद झाला.

चेतन शर्मा हा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात हॅट्रिक नोंदविणारा पहिला भारतीय खेळाडू होता.

अभिनव बिंद्रा हा ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.

पी.टी. उषा हीस 'भारताची सुवर्णकन्या' असे सुद्धा म्हणतात.




बदला


महत्त्वाच्या स्पर्धा

सांघिक खेळ

तुम्ही काय करू शकता

  • आपण खेळ क्रीडा विषयातील रसिक, खेळाडू , क्रिडा शिक्षक,क्रिडा संपादक,क्रिडा बातमीदार लेखक अथवा वाचक प्रेक्षक असल्यास आपले येथे स्वागत आहे. आपण नविन लेख तयार करू शकता तसेच विस्ताराच्या प्रतिक्षेत असलेल्या लेखांमध्ये आपण आपले योगदान देउ शकता.
  • नवीन सदस्यांना विनंती :कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे.आणि अधिक माहिती आणि मदती करिता विकिपीडिया:क्रीडा येथे भेट द्यावी.


नविन लेख
विस्तार