Jump to content

देवकी पंडित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवकी पंडित

देवकी पंडित
आयुष्य
जन्म ६ मार्च, १९६५ (1965-03-06) (वय: ५९)
जन्म स्थान महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गुरू पं.वसंतराव कुलकर्णी, किशोरी आमोणकर, पं.जितेंद्र अभिषेकी
गायन प्रकार शास्त्रीय संगीत, पार्श्वगायन
घराणे आगरा घराना
संगीत कारकीर्द
पेशा गायिका

देवकी पंडित (जन्म:६ मार्च, १९६५) या शास्त्रीय गायिका आहेत.

पार्श्वभूमी[संपादन]

देवकी पंडित यांच्या आई उषा पंडित ह्या गायिका असल्याने गाण्याचे प्रथम संस्कार घरातूनच झाले. त्यांची गाण्याची साधना लहानपणापासूनच सुरू झाली. सुरुवातीला देवकी पंडित यांनी पं.वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. किशोरी आमोणकर यांच्याकडूनही त्यांनी शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जवळ जवळ १२ वर्षे पं.जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिक्षण घेतलं. अभिषेकी बुवांकडे शिकत असताना गाण्याच्या विविध अंगांचं, प्रकारांचं आणि सादरीकरणाचं त्यांचं ज्ञान विस्तारत गेलं. पं. बबनराव हळदणकर यांच्याकडूनही त्यांनी मार्गदर्शन घेतलं आहे.[१]

कारकीर्द[संपादन]

वयाच्या बाराव्या वर्षी त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका (बालगीते - 'फुलराणी', गीतकार - शंकर वैद्य, प्रवीण दवणे) पॉलिडॉर कंपनीतर्फे प्रसिद्ध झाली. ह्या ध्वनिमुद्रिकेसाठी संगीतकार नंदू होनप यांनी संगीत दिलं होतं. देवकी पंडित यांनी दूरदर्शन वर पहिल्यांदा अरुण काकतकर यांची निर्मिती असलेल्या एका कार्यक्रमासाठी गायन केलं होतं. टेलिव्हिजनसाठी प्रथम त्यांचं गाणं रेकॉर्ड झालं ते सुधीर मोघे यांचं - ‘प्रीतीवाचून मरावे हेचि असेल प्राक्तन, प्रीतीवाचून जगेन’. त्यांनंतर त्यांनी संगीतकार पं.हृदयनाथ मंगेशकर, बाळ बर्वे, यशवंत देव, रवी दाते, अनिल-अरुण यांच्या बरोबर दूरदर्शन वर अनेक कार्यक्रमासाठी गायन केलं आहे.[१]

१९८४ साली आलेल्या ‘माहेरची माणसं’ (संगीतकार - सुधीर फडके) या चित्रपटातून चित्रपट पार्श्वगायनाची सुरुवात केली. १९८५ साली ‘अर्धांगी’ (संगीतकार - अशोक पत्की) या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केलं, ह्याच चित्रपटातील ‘चुनरी नको ओढू’ या गीतासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी नशीबवान, एक होता विदूषक, देवकी, भेट, नॉट ओन्ली मिसेस राऊत, सातच्या आत घरात, आम्ही असू लाडके, आईशप्पथ, सावली, तिन्हीसांजा, फॉरेनची पाटलीन, सुखांत, मी सिंधुताई सपकाळ, अनुमती अशा अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.

'कभी हा कभी ना', 'साज', 'डर', 'बेताबी', 'गुड्डू', 'दायरा', 'पांडव', 'परंपरा' अशा अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. 'साज' ह्या चित्रपटासाठी उस्ताद झाकीर हुसैन यांचं संगीत असलेलं 'फिर भोर भयी जागा मधुबन' हे अत्यंत लोकप्रिय गाण त्यांनी गायलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जयदेवजींकडे ‘श्रीकांत’ या दूरचित्र मालिकेसाठी आणि राहुल देव बर्मन यांच्याकडे गैरफिल्मी गीत गायले आहे. के. महावीर यांच्याकडे त्या काही महिने गझल शिकल्या. संगीतकार रवींद्र जैन यांच्यासाठी रामायण मालिकेचे शीर्षक गीत गायले – ‘मंगलभवन अमंगल हारी’.

नौशाद, जयदेव, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद झाकीर हुसेन, आनंद मोडक, पं. हृदयनाथ मंगेशकर, सुधीर मोघे, अशोक पत्की, दीपक पाटेकर अशा अनेक संगीतकारांसाठी विविध चित्रपटगीते, गीतमाला (अल्बम्स), दूरचित्रवाणीवरील मालिकांची शीर्षकगीते, तसेच अनेक कार्यक्रमांतून त्यांनी गायन केले आहे. केदार पंडित, मिलिंद जोशी, सुधीर नायक, अशित देसाई, राहुल रानडे, कौशल इनामदार, सलील कुलकर्णी, निलेश मोहरीर या संगीतकारांकडेही त्या गायल्या आहेत. त्यांनी आराधना महाकाली, रामरक्षा स्तोत्रम्, गणाधीश, नमन गणेशा इ. गीतमालांसाठी संगीत दिग्दर्शनही केले आहे.[२]

अल्फा मराठी या वाहिनी वरील ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेच्या शीर्षक गीताच्या सुरावटीमधून त्या घराघरात पोहचल्या. दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांच्या शीर्षकगीतांमधून देवकी ताई यांचे सुर रसिकांच्या कानावर येत राहिले आणि मनात रुंजी घालत राहिले. रामायण, आभाळमाया, वादळवाट, अधुरी एक कहाणी, अवघाचि संसार, सांजभूल, जगावेगळी, बंधन, तुझ्याविना ,काटा रुते कुणाला, सांजसावल्या, किमयागार, जिवलगा, तू माझा सांगाती अशा अनेक लोकप्रिय मालिकांची शीर्षकगीते त्यांनी गायली. इतक्या मोठ्या संख्येने दूरचित्रवाणीवरील मालिका गीते गाणाऱ्या देवकी पंडित या एकमेव गायिका आहेत.[१]

सवाई गंधर्व संगीत महोत्सव, मैहर संगीत महोत्सव, देवगंधर्व संगीत महोत्सव, स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सटर्स ऑफ युनिव्हर्सल इंटिग्रेशन अशा शास्त्रीय संगीताच्या दर्जेदार कार्यक्रमांमधून आपली कला सादर केली आहे. गेली अनेक वर्षे देश-विदेशात त्या आपली कला सादर करत आहेत.[२]

झी मराठी या वाहिनी वरील ‘सारेगमप’ या सांगीतिक स्पर्धेचं परीक्षकपद त्यांनी भूषविलं आणि खऱ्या अर्थानं गाण कसं ऐकावं, कसं गावं हे सामान्य प्रेक्षक वर्गाला नव्यानेच कळू लागलं. परीक्षक या नात्याने त्यांनी महत्त्वपूर्ण सुचनांद्वारे स्पर्धकांनाच नव्हे तर आस्वादकांनाही मार्गदर्शन करणाऱ्या त्या एक शिस्तप्रिय परीक्षक म्हणून लोकप्रिय झाल्या.[२]

शास्त्रीय संगीताची बैठक पक्की असलेल्या देवकी ताईंच्या आवाजातील गोडवा आणि लवचिकता या गुणांमुळेच त्या नाट्यसंगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, ठुमरी, गझल असे गानप्रकार लीलया पेलताना दिसतात. [३]

शीर्षकगीते[संपादन]

देवकी पंडित यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते गायिली आहेत.

मालिका गीतकार संगीतकार वाहिनी
रामायण जयदेव रविंद्र जैन दूरदर्शन
सात फेेरे हरिवंश राय बच्चन राहुल देव बर्मन
हसरतें सुधीर मोघे झी टीव्ही
आपली माणसे मंगेश कुळकर्णी अशोक पत्की

ई टीव्ही मराठी

काटा रुते कुणाला शांता शेळके अशोक पत्की
कालाय तस्मै नमः अशोक पत्की
किमयागार मंगेश कुळकर्णी अशोक पत्की
गंध फुलांचा गेला सांगून अशोक पत्की अशोक पत्की
तू माझा सांगाती दासू वैद्य अशोक पत्की
मंथन मंगेश कुळकर्णी अशोक पत्की
सप्तपदी विजू माने अशोक पत्की
सांजसावल्या सुधीर मोघे अशोक पत्की
अधुरी एक कहाणी मंगेश पाडगावकर अशोक पत्की

झी मराठी

अरुंधती अश्विनी शेंडे अशोक पत्की
अवघाचि हा संसार रोहिणी निनावे अशोक पत्की
आभाळमाया मंगेश कुळकर्णी अशोक पत्की
गुंतता हृदय हे श्रीरंग गोडबोले अशोक पत्की
ग्रहण अशोक पत्की
जगावेगळी गुरू ठाकूर अशोक पत्की
तुझ्याविना नितिन आखवे अशोक पत्की
बंधन सौमित्र अशोक पत्की
मानसी मंगेश कुळकर्णी अशोक पत्की
मृण्मयी
वादळवाट मंगेश कुळकर्णी अशोक पत्की
सांजभूल मिथिला सुभाष दीपक पाटेकर
आमदार सौभाग्यवती अशोक पत्की मी मराठी


फिरुनी नवी जन्मेन मी अशोक पत्की
अहंकार मिथिला सुभाष दीपक पाटेकर सह्याद्री
ओढ लावी जीवा बाबा चव्हाण अशोक पत्की
आणि अचानक अशोक बागवे अशोक समेळ
नातं रक्ताचं रविंद्र अवटी अभिजीत लिमये
पदरी आलं आभाळ दासू वैद्य अशोक पत्की
भरारी अशोक पत्की
विधिलिखित प्रविण दवणे अशोक पत्की
राग एक रंग अनेक
अजूनही बरसात आहे रोहिणी निनावे अशोक पत्की सोनी मराठी
एक होती राजकन्या अश्विनी शेंडे अशोक पत्की
अग्निहोत्र श्रीरंग गोडबोले राहुल रानडे स्टार प्रवाह
गोष्ट एका आनंदीची संदीप खरे अशोक पत्की
जीवलगा संदीप खरे अशोक पत्की
झुंज रोहिणी निनावे अशोक पत्की
तुझंनी माझं घर श्रीमंताचं दासू वैद्य अशोक पत्की

देवकी पंडित यांनी गायिलेली चित्रपट गीते[संपादन]

गीत गीतकार संगीतकार सहगायक / सहगायिका चित्रपट वर्ष भाषा
तिथे नांदे शंभू सुधीर मोघे सुधीर फडके रविंद्र साठे, श्रीकांत पारगांवकर, अरुण इंगळे, शोभा जोशी, अपर्णा मयेकर माहेरची माणसं १९८४ मराठी
यल्लमा मेरी यल्लमा वसंत देव बी.व्ही.कारंथ इला अरुण गिद्ध - द व्हल्चर १९८४ हिंदी
यल्लमा तेरा उदय हो वसंत देव बी.व्ही.कारंथ इला अरुण
चुनरी नको ओढू वंदना विटणकर अशोक पत्की - अर्धांगी १९८५ मराठी
नयनात रेखिलेले ते स्वप्न सुधीर नांदोडे अनिल-अरुण सुरेश वाडकर हिचं काय चुकलं १९८६ मराठी
मैय्या मैय्या बोले विनोद शर्मा जगजित सिंग - ज्वाला १९८६ हिंदी
जणू तेजाची गंगा जाई विश्वनाथ मोरे - वहिनीसाहेब १९८७ मराठी
ॠण फिटता फिटेना सुधीर मोघे आनंद मोडक - नशिबवान १९८८ मराठी
नवी नवी प्रीत ही मोहरली प्रविण दवणे अनिल मोहिले सुरेश वाडकर मुंबई ते मॉरिशस १९९१ मराठी
जाळीमंदी झोंबतोया गारवा ना.धो.महानोर आनंद मोडक रविंद्र साठे एक होता विदूषक १९९२ मराठी
तुम्ही जाऊ नका हो रामा आशा भोसले
सूर्यनारायणा नित नेमाने -
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा -
लाल पैठणी रंग रविंद्र साठे
काळजातली हाक मुक्याने विवेक आपटे अनिल मोहिले सुरेश वाडकर जगावेगळी पैज १९९२ मराठी
मांगती है प्यासी धरती आनंद बक्षी शिव-हरी लता मंगेशकर परंपरा १९९२ हिंदी
अंग से अंग लगाना आनंद बक्षी शिव-हरी सुदेश भोसले, अलका याज्ञिक, विनोद राठोड डर १९९३ हिंदी
कब रात आये सावन कुमार महेश-किशोर - इकके पे इकका १९९४ हिंदी
सोऊंगा न सोने दुंगा कुमार सानू
वो तो है अलबेला मजरूह सुल्तानपुरी जतिन-ललित कुमार सानू कभी हा कभी ना १९९४ हिंदी
कसम है प्यार की तुम्हे महेंद्र देहलवी जतिन-ललित कुमार सानू पांडव १९९५ हिंदी
प्यार का अंदाज तुम मजरूह सुल्तानपुरी उदित नारायण
सपने सजाकर महेंद्र देहलवी -
हम दो पंछी मजरूह सुल्तानपुरी नौशाद कुमार सानू गुड्डू १९९५ हिंदी
प्यार मेरा जिंदगी कुमार सानू
गुलशन गुलशन कली सुरेश वाडकर
डॅडी से पूछ लेना कुमार सानू
दायी आंख बोले गुलजार आनंद-मिलिंद - दायरा १९९६ हिंदी
झुठी मुठी रुठी समीर विशाल भारद्वाज सुरेश वाडकर, के.के. बेताबी १९९७ हिंदी
फिर भोर भयी जावेद अख्तर झाकीर हुसैन - साज १९९८ हिंदी
बादल चांदी बरसाये भुपेन हजारिका ज्योत्स्ना हर्डीकर
आज हम रोशन करेंगे राजकमल -
मी धरणी सांगते कहाणी जगदीश खेबूडकर अच्युत ठाकुर - लढाई १९९९ मराठी
ही लढाई अशी लढाई जगदीश खेबूडकर अच्युत ठाकुर -
तुझ्याविना हा श्रावण वैरी अशोक बागवे अनिल मोहिले - रंग प्रेमाचा १९९९ मराठी
सप्‍तस्वरांनो लयशब्दांनो सुधीर मोघे आनंद मोडक - राजू २००० मराठी
देवकी गाते अंगाई ललित सेन - देवकी २००१ मराठी
सोहळा मांडीला मी जगदीश खेबूडकर संजय गीते - अष्टरूपा जय वैभवलक्ष्मी माता २००१ मराठी
हो नाही हो नाही करता दासू वैद्य अशोक पत्की सुरेश वाडकर भेट २००२ मराठी
सावलीत माझ्या कवडसे गजेंद्र अहिरे कौशल इनामदार - नॉट ओनली मिसेस राऊत २००३ मराठी
अर्थ कळेना जगण्याचा विजय कुवळेकर राहुल रानडे - सातच्या आत घरात २००४ मराठी
धाव घेई विठ्ठला जगदीश खेबूडकर बाळ पळसुळे - राजा पंढरीचा २००४ मराठी
संसार मंदिरी आले जगदीश खेबूडकर संजय गीते - कुंकू लावते माहेरचं २००४ मराठी
कोणत्या स्वप्नात वेडी माणसे  संदीप खरे नरेंद्र भिडे - कलम ३०२ २००५ मराठी
सारे आहे समीप तरीही रविशंकर झिंगरे शशी मिलिंद - झुळूक एक मोहक स्पर्श २००५ मराठी
हातावरली माझ्या मेंदी -
जाऊ कुठे कळेना अमेय दाते
असेच हे कसेबसे सुरेश भट अशोक पत्की - आम्ही असू लाडके २००५ मराठी
अंतरीही उरते काही केदार कुळकर्णी केदार कुळकर्णी कधी अचानक २००५ मराठी
काल होते सर्व काही केदार कुळकर्णी -
तुला कधी कळेल का गजेंद्र अहिरे आनंद मोडक - दिवसेंदिवस २००६ मराठी
सारंगा रे सारंगा सौमित्र अशोक पत्की - आईशप्पथ २००६ मराठी
ऐनक मे छब देखन जाऊ अशोक पत्की संजीव चिमल्गी
दरवळला अनोखा गंध नवा मंगेश कुलकर्णी अशोक पत्की स्वप्निल बांदोडकर विश्वास २००६ मराठी
चित्रलिपी ही ज्याची त्याची सुरेश वाडकर २००६
मनात उठती सागरलाटा अशोक पत्की सुरेश वाडकर आव्हान २००७ मराठी
मंदावले दीप दाही दिशांनी जितेंद्र कुलकर्णी - मन पाखरू पाखरू २००७ मराठी
नीळ रंगी रंगले श्रीधर कामत अशोक पत्की - सावली २००६ मराठी
मैफिलीचा रंग -
वादळ वेगाने ये -
तू पंचप्राण सुखनिधान जगदीश खेबूडकर अशोक पत्की - श्री सिद्धिविनायक महिमा २००७ मराठी
नीज बाळे नीज ना गंगाधर महाम्बरे निर्मल कुमार - झाले मोकळे आकाश २००९ मराठी
तिन्हीसांजा पसरल्या सुधीर मोघे अशोक पत्की - तिन्हीसांजा २००९ मराठी
पंखात पाखरांच्या गोड फ.मुं.शिंदे अशोक पत्की नंदेश उमप फॉरेनची पाटलीन २००८ मराठी
कानात बोले प्रिती जगदीश खेबूडकर अच्युत ठाकुर स्वप्निल बांदोडकर येळकोट येळकोट जय मल्हार २००९ मराठी
चंद्र झोपला गं तेथे आनंद म्हसवेकर मिथिलेश पाटणकर - जन्म २००९ मराठी
इतकेच मला जाताना सुरेश भट अशोक पत्की - मी सिंधुताई सपकाळ २०१० मराठी
कशी ही बोलकी सुरेश भट -
माऊलीच्या दुधापरी ग.दि.माडगूळकर -
हे भास्करा क्षितिजावरी या प्रविण दवणे -
झाडाला धडकून गेली बाबासाहेब सौदागर -
पहिल्या प्रीतीचा गंध ललित सेन - अर्जुन २०१० मराठी
ओ नाखवा रे सुप्रिया काळे अनिरुद्ध काळे - मोहन आवटे २०११ मराठी
जाळीमंदी पिकली करवंद ग.दि.माडगूळकर सुधीर फडके - गोळाबेरीज २०१२ मराठी
चल चाल चाल तू बाळा जयंत धुपकर - स्पंदन २०१२ मराठी
या जगण्याचे जयंत धुपकर -
एक छाया जवळ येते सदानंद डबीर मिलिंद जोशी - अशाच एका बेटावर २०१३ मराठी
माझ्या अंगणी झोपाळा यशवंत देव - लेक लाडकी २०१३ मराठी
भावना दाटुनी येता दिनेश वैद्य कमलेश भडकमकर - भाकरखाडी ७ किमी २०१३ मराठी
माझ्याच माणसांना शोधित अजय कांडर स्वानंद राजाराम - म्हादू २०१३ मराठी
फुलांची पालखी निघाली गजेंद्र अहिरे - अनुमती २०१३ मराठी
कोना कोना दिल का संदीप नाथ संदीप - साहेब बीवी और गैंगस्टर रिटर्न्स २०१३ हिंदी
ना कळले मला संजय नवगीरे अशोक पत्की - घर होतं मेणाचं २०१८ मराठी
गुंतले कशी तुझ्यात प्रविण दवणे अशोक पत्की सुरेश वाडकर काही क्षण प्रेमाचे २०१९ मराठी
जीवनाचा सोहळा वैभव जोशी आशिष मुजूमदार - एबी आणि सीडी २०२० मराठी

देवकी पंडित यांनी गायलेली भावगीते[संपादन]

गीत गीतकार संगीतकार सहगायक
प्रीतीवाचून मरावे हेचि असेल प्राक्तन सुधीर मोघे सुधीर मोघे -
माझी उदास गीते सुरेश भट पं.जितेंद्र अभिषेकी -
रंगुनी रंगात साऱ्या सुरेश भट सुधीर मोघे -
कितीक काळ हालला कवी अनिल आनंद मोडक -
पावसा पावसा किती येशील कवी अनिल आनंद मोडक -
अशी सांज का विजया जहागिरदार बाळ बर्वे -
स्वरफुलांनो उमलू या प्रफुल्ल रणदिवे अशोक पत्की -
आषाढाच्या सघन घनसम प्रविण दवणे दीपक पाटेकर -
या रे सारे गाऊया यशवंत देव यशवंत देव सुरेश वाडकर
जरा जरा धुके निळे सदानंद डबीर केदार पंडित मिलिंद इंगळे
ऊन लागले तुला कवी ग्रेस सलील कुलकर्णी -
अशा सांजवेळी निळाईत जेव्हा वैभव जोशी श्रेयस बेडेकर -
वळणावर आयुष्याच्या मी दीप लाविला होता अजित मालंडकर केदार पंडित -

अल्बम[संपादन]

अल्बम संगीतकार
फुलराणी नंदू होनप
शब्दस्वरांच्या चांदण्यात राहुल घोरपडे
सारे तुझ्यात आहे अभिजीत राणे
सांगू कुणास ही प्रीत श्रद्धा सामंत
रूतलेल्या आठवणी संजय हांडे
गगनाला पंख नवे संजय
घन भरून येती नरेंद्र देशपांडे
शुभंकर गणेशा अशोक पत्की
अलगद अशोक पत्की
पाऊस मनातला अशोक पत्की
मन माझे अशोक पत्की
भजनामृत अशोक पत्की
श्री सदगुरू गीते अशोक पत्की
राजाई माझी माय कनकराज
तरीही
तुझा अबोला अशोक पत्की
नमन गणेशा देवकी पंडित
स्वर गणेश केदार पंडित
नदीकिनारी शैलेश दाणी
धिम ताना धिम ताना नीला-आकाश
आकाश पेलताना
मन मुठीतून घरंगळताना मधुकर झिरादकर
तुझी सावली दे केदार पंडित
समर्थ धुन सुधीर मोघे
झाला दत्तगुरू जयकार आशिष मुजूमदार
तू करुणेचा सिंधू मंदार आपटे
गोड तुझे रूप विलास पाटील
दयाघना पांडुरंगा यशवंत देव
गाणारं झाड आशिष केसकर
विंदानुभूती निलेश मोहरीर
साजणा विक्रम पेंढारकर
गणाधीश देवकी पंडित
तरंगिणी मिलिंद जोशी
कविता रसावलेली श्रीनिवास खळे
बेहोशीतले गाणे प्रदीप साठे
मोहने मन हरयो सुधीर नायक
सुनो जरा नितिन शंकर
खुशबू
हलका नशा उत्पल बिस्वास

इतर गायन[संपादन]

  • नाटक - आसू आणि हासू, संगीत - अशोक पत्की
  • नाटक - आहे मधुर तरीही, संगीत - अशोक पत्की
  • विशेष मालिका - कवडसे, संगीत - अशोक पत्की (अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यावर आधारित विशेष कार्यक्रमासाठी, वाहिनी - सह्याद्री)
  • मालिका - या सुखांनो या, संगीत - अशोक पत्की (पार्श्वगायन - सुख म्हणावे कशाला, वाहिनी - झी मराठी)
  • स्वप्नांना पंख नवे (वाहिनी गीत - स्टार प्रवाह, संगीत - अवधूत गुप्ते)

पुरस्कार[संपादन]

  • १९८६ - महाराष्ट्र राज्य पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, चित्रपट - अर्धांगी
  • २००१ - अल्फा गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, चित्रपट - राजू
  • २००२ - अल्फा गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, चित्रपट - देवकी
  • २००२ - मेवाती घराणा पुरस्कार
  • २००४ - अल्फा गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, चित्रपट - नॉट ओन्ली मिसेस राऊत
  • २००६ - आदित्य बिर्ला कला किरण पुरस्कार
  • २००७ - महाराष्ट्र राज्य पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, चित्रपट - सावली
  • २०११ - महाराष्ट्र राज्य पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, चित्रपट - अर्जुन
  • २०११ - झी गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, चित्रपट - अर्जुन
  • २०१४ - आयबीएन लोकमत 'प्रेरणा' पुरस्कार
  • अब्दुल कलाम यांच्या हस्ते 'यंग माइस्ट्रो पुरस्कार' (Indian Music Academy)
  • केसरबाई केरकर शिष्यवृत्ती

बाह्य दुवे[संपादन]

https://www.aathavanitli-gani.com/Swar/Devaki_Pandit - 'आठवणीतली गाणी' या संकेतस्थळावर देवकी पंडित यांनी गायलेली गाणी

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c "माझे संगीतकार". Maharashtra Times. 2022-03-26 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "देवकी सुधाकर पंडित". महाराष्ट्र नायक (इंग्रजी भाषेत). 2022-03-26 रोजी पाहिले.
  3. ^ "गुरूतुल्य संगीतकार". Maharashtra Times. 2022-03-26 रोजी पाहिले.