Jump to content

द्वारकानाथ कोटणीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द्वारकानाथ कोटणीस
जन्म सोलापूर
१० ऑक्टोबर १९१०
मृत्यू ९ डिसेंबर १९४२
चीन
राष्ट्रीयत्व भारत ध्वज भारत
नागरिकत्व भारतीय
प्रशिक्षणसंस्था मुंबई विद्यापीठ
पेशा वैद्य
धर्म हिंदू


नॉर्मन बेथ्यून यांच्य स्मृतीस पुष्पचक्र समर्पिणारे द्वारकानाथ कोटणीस (चित्राचा काळ अज्ञात)

डॉ. द्वारकानाथ कोटणीस (ऑक्टोबर १०, १९१० - डिसेंबर ९, १९४२) हे मराठी-भारतीय डॉक्टर होते. दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली. तेथेच डिसेंबर ९, १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनावर 'डॉक्टर कोटनीस की अमर कहानी' नावाचा एक हिंदी चित्रपट व्ही.शांताराम यांनी काढला होता.