Jump to content

धोलपूर मोहीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धोलपूर मोहीम ही पेशवा बाळाजी बाजीराव याने उत्तर भारतात मराठा साम्राज्याचे प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी काढलेल्या चार लष्करी मोहीमांपैकी पहिली मोहीम होती. इ.स. १७४१ साली बाळाजीने ही मोहीम हाती घेतली.

पार्श्वभूमी[संपादन]

पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत मराठ्यांनी माळवागुजरातवर आपली पकड घट्ट केली होती तरी मुघल बादशहा आणि दिल्ली दरबाराची कायदेशीर मान्यता त्यासाठी आवश्यक होती. नादिरशहाच्या दिल्लीवरील आक्रमणानंतर लगेचच पेशव्याचे अकाली निधन झाल्याने कायदेशीर मान्यतेचा प्रश्न अनिर्णित राहिला.