Jump to content

नवाझ शरीफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवाझ शरीफ (इ.स. १९९८)

मियां मोहम्मद नवाझ शरीफ (पंजाबी, उर्दू: میاں محمد نواز شریف ; रोमन लिपी: Mian Mohammad Nawaz Sharif;) (डिसेंबर २५, इ.स. १९४९; लाहोर, पंजाब, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी, उद्योजक व पाकिस्तानाचा माजी पंतप्रधान आहे. नोव्हेंबर १, इ.स. १९९० ते जुलै १८, इ.स. १९९३ या कालखंडात पहिल्यांदा व त्यानंतर फेब्रुवारी १७, इ.स. १९९७ ते ऑक्टोबर १२, इ.स. १९९९ या कालखंडात दुसऱ्यांदा, अश्या दोन वेळा त्याने पाकिस्तानाचे पंतप्रधानपद सांभाळले. पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट) हा त्याचा राजकीय पक्ष आहे. इ.स. १९९८ साली भारताने केलेल्या अण्वस्त्रचाचण्यांच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानाच्या अण्वस्त्रचाचण्या करण्याचे आदेश त्याने दिले.

शरीफने भ्रष्टाचाराद्वारे पैसा गोळा केल्याचे जुलै २०१७मध्ये सिद्ध झाल्यावर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला कोणतेही सार्वजनिक पद घेण्यापासून १० वर्षे बंदी केली. शरीफने ३१ जुलै, २०१७ रोजी पंतप्रधानपद सोडले.

बाह्य दुवे[संपादन]