Jump to content

पकडा-पकडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पकडा-पकडी हा लहान मुलांचा आवडीचा खेळ आहे. यात एकापेक्षा जास्त मुलांचा समावेश होतो. खेळणाऱ्या मुलांपैकी एकावर राज्य येते. त्याने इतरांना पकडून किंवा स्पर्श करून बाद करायचे असा प्रघात आहे. सर्वजण बाद झाल्यावर जो सर्वात प्रथम बाद झाला त्यावर राज्य येते व त्या मुलाने इतरांना पकडायचे अशाप्रकारचे या खेळाचे स्वरूप आहे.

हा खेळ मोकळ्या जागी खेळला जातो, तरी यासाठी फार मोठ्या मैदानाची गरज भासत नाही. तसेच इतर कोणतीही साधने या खेळास लागत नसल्याने हा एक लोकप्रिय खेळ आहे.