Jump to content

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१
वेस्ट इंडीज महिला
पाकिस्तान महिला
तारीख ३० जून – १८ जुलै २०२१
संघनायक स्टेफनी टेलर जव्हेरिया खान
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा किशोना नाइट (१८१) उमैमा सोहेल (१९१)
सर्वाधिक बळी अनिसा मोहम्मद (१२) फातिमा सना (११)
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा किशोना नाइट (६९) निदा दर (५५)
सर्वाधिक बळी शमिलिया कॉनेल (५) निदा दर (४)
फातिमा सना (४)
डायना बेग (४)
मालिकावीर शमिलिया कॉनेल (वेस्ट इंडीज)

पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून - जुलै २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. राष्ट्रीय संघांसोबतच पाकिस्तान महिलांच्या क्रिकेट संघाने देखील तीन ५० षटकांचे आणि तीन २० षटकांचे सामने वेस्ट इंडीज अ महिलांविरुद्ध खेळले.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने अनौपचारिक ट्वेंटी२० सामने हे त्या त्या दिवशी त्याच मैदानावर थोड्या वेळाच्या अंतराने खेळविण्यात आले. दोन्ही संघांमधली ही पहिलीच अ संघाची द्विपक्षीय मालिका होती. ५० षटकांचे अनौपचारिक सामने हे विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या सरावासाठी आयोजित करण्यात आले. वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी स्टेफनी टेलरकडे कर्णधारपद दिले तर अनौपचारिक सामन्यांची रेनीस बॉइसला कर्णधार नेमले. पाकिस्तानने जव्हेरिया खानकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांची जवाबदारी दिली. तसेच सिद्रा नवाझ हिला २० षटकांच्या सामन्यांसाठी कर्णधार नेमण्यात आले आणि रमीन शमीमला ५० षटकांच्या सामन्यांसाठी कर्णधार नियुक्त केले गेले.

पहिल्या ट्वेंटी२० सामन्यातच पुरुष अथवा महिला प्रकारात निदा दर ट्वेंटी२०त १०० गडी बाद करणारी पाकिस्तानची पहिली क्रिकेट खेळाडू ठरली. २ जुलै २०२१ रोजी दुसऱ्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यादरम्यान वेस्ट इंडीजच्या छिनेल हेन्री आणि चेडिअन नेशन ह्या दोघी अचानक भोवळ येऊन मैदानावर पडल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली. त्या दोघींना लागलीच इस्पीतळात दाखल करण्यात आले. थोड्यावेळानेच दोघी खेळाडूंची प्रकृती स्थिर असल्याचे इस्पीतळाकरून स्पष्ट करण्यात आले. दोन्ही खेळाडूंच्या जागी बदली खेळाडू नियुक्त झाल्यावर उर्वरीत सामना खेळवला गेला. दोन्ही खेळाडू तिसरा सामना खेळण्यासाठी परत ठणठणीत होऊन संघात परतल्या.

पाकिस्तान अ महिलांनी २० षटकांची मालिका ३-० ने जिंकली. तसेच दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय महिला संघाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली. तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात वेस्ट इंडीजची कर्णधार स्टेफनी टेलर हिने हॅट्रीक घेतली. महिला ट्वेंटी२०त हॅट्रीक घेणारी स्टेफनी वेस्ट इंडीजची दुसरी खेळाडू ठरली. वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय महिला संघाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत मालिकेत अभेद्य आघाडी मिळवली. पाकिस्तानी महिलांनी चौथा सामना जिंकला आणि दौऱ्यातील पहिला विजय मिळवला. दुसरीकडे पाकिस्तान अ महिला संघाने ५० षटकांची मालिका ३-० ने जिंकली.

वेस्ट इंडीज महिला वि पाकिस्तान महिला आंतरराष्ट्रीय मालिका[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३० जून २०२१
१४:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१३६/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२६/६ (२० षटके)
हेली मॅथ्यूस ३२ (२८)
निदा दर २/१५ (४ षटके)
आयेशा नसीम ४५* (३३)
शमिलिया कॉनेल ३/२१ (४ षटके)
वेस्ट इंडीज महिला १० धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि दनेश रामधानी (विं)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.


२रा सामना[संपादन]

२ जुलै २०२१
१४:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१२५/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०३/६ (१८ षटके)
किशोना नाइट ३०* (२०)
फातिमा सना २/१८ (४ षटके)
निदा दर २९ (३६)
हेली मॅथ्यूस १/१३ (४ षटके)
वेस्ट इंडीज महिला ७ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: क्रिस्टोफर टेलर (विं) क्रिस राइट (विं)
सामनावीर: किशोना नाइट (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • पावसामुळे पाकिस्तानी महिलांना १८ षटकांमध्ये ११० धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


३रा सामना[संपादन]

४ जुलै २०२१
१४:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१०२ (१९.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०६/४ (१९.१ षटके)
मुनीबा अली १८ (१५)
स्टेफनी टेलर ४/१७ (३.४ षटके)
स्टेफनी टेलर ४३* (४१)
डायना बेग २/१७ (४ षटके)
वेस्ट इंडीज महिला ६ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि व्हर्डेन स्मिथ (विं)
सामनावीर: स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

७ जुलै २०२१
०९:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०५/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०९/५ (४७.५ षटके)
निदा दर ५५ (७१)
स्टेफनी टेलर ३/२९ (१० षटके)
स्टेफनी टेलर १०५* (११६)
सादिया इक्बाल २/४७ (१० षटके)
वेस्ट इंडीज महिला ५ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: व्हर्डेन स्मिथ (विं) आणि क्रिस राइट (विं)
सामनावीर: स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • कॅनिशा आयझॅक (वे.इं.) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

९ जुलै २०२१
०९:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१२० (४२.४ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२१/२ (३१.१ षटके)
मुनीबा अली ३७ (६३)
अनिसा मोहम्मद ४/२७ (९.४ षटके)
वेस्ट इंडीज महिला ८ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: दनेश रामधानी (विं) आणि क्रिस्टोफर टेलर (विं)
सामनावीर: हेली मॅथ्यूस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.

३रा सामना[संपादन]

१२ जुलै २०२१
०९:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८२ (४९ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८३/२ (४०.१ षटके)
उमैमा सोहेल ६२ (७९)
अनिसा मोहम्मद ३/२५ (१० षटके)
हेली मॅथ्यूस १००* (१२१)
अनाम अमीन १/३५ (१० षटके)
वेस्ट इंडीज महिला ८ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि क्रिस्टोफर टेलर (विं)
सामनावीर: हेली मॅथ्यूस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • आयेशा नसीम (पाक) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


४था सामना[संपादन]

१५ जुलै २०२१
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२१० (४९.४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१४/६ (४८.३ षटके)
किशोना नाइट ८८ (१४०)
फातिमा सना ४/३० (८ षटके)
उमैमा सोहेल ६१ (८९)
शकीरा सलमान २/३७ (९.३ षटके)
पाकिस्तान महिला ४ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: दनेश रामधानी (विं) आणि व्हर्डेन स्मिथ (विं)
सामनावीर: फातिमा सना (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.
  • रशादा विल्यम्स (वे.इं.) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


५वा सामना[संपादन]

१८ जुलै २०२१
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१९०/८ (३४ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७१ (३४ षटके)
मुनीबा अली ३९ (५९)
शबिका गजनबी २/२६ (६ षटके)
ब्रिटनी कूपर ४० (५३)
फातिमा सना ५/३९ (७ षटके)
पाकिस्तान महिला २२ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि व्हर्डेन स्मिथ (विं)
सामनावीर: फातिमा सना (पाकिस्तान)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे पाकिस्तानचा डाव ३४ षटकांनंतर समाप्त करण्यात आला. वेस्ट इंडीज महिलांना ३४ षटकांमध्ये १९४ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


वेस्ट इंडीज अ महिला वि पाकिस्तान अ महिला मालिका[संपादन]

अनौपचारिक महिला ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३० जून २०२१
०९:००
धावफलक
वेस्ट इंडीज अ महिला वेस्ट इंडीज
९६/८ (२० षटके)
वि
पाकिस्तान पाकिस्तान अ महिला
९८/३ (१८.५ षटके)
रशादा विल्यम्स ३३ (४१)
रमीन शमीम २/८ (३ षटके)
आयेशा झफर ४०* (४५)
मँडी मंग्रू १/९ (२ षटके)
पाकिस्तान अ महिला ७ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: व्हर्डेन स्मिथ (विं) आणि क्रिस्टोफर टेलर (विं)
  • नाणेफेक : पाकिस्तान अ महिला, क्षेत्ररक्षण.


२रा सामना[संपादन]

२ जुलै २०२१
०९:००
धावफलक
पाकिस्तान अ महिला पाकिस्तान
१०८/५ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ महिला
९४ (१९.४ षटके)
मुनीबा अली २७ (१६)
स्टेफी सूग्रीम १/९ (४ षटके)
पाकिस्तान अ महिला १४ धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि दनेश रामधानी (विं)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज अ महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना[संपादन]

४ जुलै २०२१
०९:००
धावफलक
वेस्ट इंडीज अ महिला वेस्ट इंडीज
९९/६ (२० षटके)
वि
पाकिस्तान पाकिस्तान अ महिला
१००/२ (१८.४ षटके)
रेनीस बॉइस ४२ (४४)
सईदा अरूब शाह २/१३ (३ षटके)
आयेशा झफर ५३* (५७)
शबिका गजनबी १/१८ (३ षटके)
पाकिस्तान अ महिला ८ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: बर्नार्ड जोसेफ (विं) आणि क्रिस राइट (विं)
  • नाणेफेक : पाकिस्तान अ महिला, क्षेत्ररक्षण.


अनौपचारिक महिला एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१० जुलै २०२१
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज अ महिला वेस्ट इंडीज
१७९/८ (५० षटके)
वि
पाकिस्तान पाकिस्तान अ महिला
१८१/१ (३४ षटके)
रशादा विल्यम्स ७० (११२)
अनाम अमीन २/२८ (९ षटके)
जव्हेरिया रौफ ८६* (१००)
शबिका गजनबी १/२० (४ षटके)
पाकिस्तान अ महिला ९ गडी राखून विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: बर्नार्ड जोसेफ (विं) आणि क्रिस राइट (विं)
  • नाणेफेक : पाकिस्तान अ महिला, क्षेत्ररक्षण.


२रा सामना[संपादन]

१३ जुलै २०२१
०९:३०
धावफलक
पाकिस्तान अ महिला पाकिस्तान
२६९/५ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अ महिला
१८९/४ (५० षटके)
सिद्रा अमीन १०८* (१४३)
चेरी-ॲन फ्रेझर २/५३ (९ षटके)
राचेल व्हिन्सेंट ५६ (१०९)
कैनात इम्तियाझ १/२४ (६ षटके)
पाकिस्तान अ महिला ८० धावांनी विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: दनेश रामधानी (विं) आणि ख्रिस राइट (विं)
  • नाणेफेक : पाकिस्तान अ महिला, फलंदाजी.


३रा सामना[संपादन]

१६ जुलै २०२१
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज अ महिला वेस्ट इंडीज
२०४ (४७.५ षटके)
वि
पाकिस्तान पाकिस्तान अ महिला
२०५/३ (४२.२ षटके)
कियाना जोसेफ ४८ (५६)
ऐमान अनवर ३/२२ (१० षटके)
पाकिस्तान अ महिला ७ गडी राखून विजयी.
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा
पंच: जोनाथन ब्लेड्स (विं) आणि क्रिस्टोफर टेलर (विं)
  • नाणेफेक : पाकिस्तान अ महिला, क्षेत्ररक्षण.