Jump to content

फ्रँक जॅक फ्लेचर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रँक जॅक फ्लेचर (२९ एप्रिल, १८८५:मार्शलटाउन, आयोवा, अमेरिका - २५ एप्रिल, १९७३:बेथेस्डा, मेरीलँड, अमेरिका) हे अमेरिकेचे दर्यासारंग होते. दुसऱ्या महायुद्धातील कॉरल समुद्राची लढाई आणि मिडवेची लढाई या दोन महत्त्वाच्या आरमारी लढायांमध्ये फ्लेचरने अमेरिकन आरमाराचे सेनापती होते.

फ्लेचर हे लेफ्टनंट असताना बेराक्रुथच्या लढाईत दाखविलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना मेडल ऑफ ऑनर हा अमेरिकन सैन्याचे सर्वोच्च पदक देण्यात आला होता. याच लढाईत त्यांचे काका अ‍ॅडमिरल फ्रँक फ्रायडे फ्लेचर यांनाही हे पदक देण्यात आले होते.