Jump to content

फकीरराव मुंजाजी शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ.मुं. शिंदे या पानावरून पुनर्निर्देशित)


फकीरराव मुंजाजी शिंदे
जन्म नाव फकीरराव मुंजाजी शिंदे
जन्म १९४८
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता

फ.मुं. शिंदे (फकीरराव मुंजाजी शिंदे. १९४८ - हयात) हे मराठी कवी, लेखक आहेत.

त्यांची आई ही कविता खूप प्रसिद्ध आहे

आई एक नाव असतं

घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!

सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही

आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पालं उठतात

पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात

आई मनामनात तशीच जाते ठेवून काही

जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही

आई असतो एक धागा

वातीला उजेड दावणारी समईतली जागा

घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान

विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

पिकं येतात जातात

माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान

दिसत नसलं डोळ्यांना तरी

खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण

याहून का निराळी असते आई?

ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी?

आई खरंच काय असते?

लेकराची माय असते

वासराची गाय असते

दुधाची साय असते

लंगड्याचा पाय असते

धरणीची ठाय असते

आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!

जीवन[संपादन]

महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील 'रुपूर' गावी कळमनुरी तालुनक्यात १९४८ साली शिंद्यांचा जन्म झाला.
पेशाने ते मराठीचे प्राध्यापक आहेत.ते सध्या औरंगाबाद मधील पदंपुरा येथे राहतात. ' आई ' कविता प्रसिद्ध असुन वाचकांच्या अंतकरणाला भिडणारी आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • अवशेष (१९७९)
  • आई आणि इतर कविता
  • आदिम (१९७५)
  • आयुष्य वेचताना
  • कबंध
  • कालमान (काव्यसमीक्षा)
  • गणगौळण
  • गाथा
  • गौरवग्रंथ
  • जुलूस
  • दिल्ली ते दिल्ली
  • फकिराचे अभंग
  • निरंतर
  • निर्मिकाचं निरूपण
  • निर्वासित नक्षत्र
  • पाठभेद
  • प्रार्थना
  • फकिराचे अभंग
  • मिथक
  • मी सामील समूहात
  • मेणा
  • लाकडाची फुले
  • लोकगाणी
  • वृंदगान
  • सार्वमत
  • सूर्यमुद्रा
  • स्वान्त (१९७३)
  • क्षेत्र

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठान(जामखेड)चा संत नामदेव पुरस्कार २०१०
  • कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार (२०११)
  • पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने देण्यात येणारा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार (२०१३)
  • मराठी रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे अध्यक्षपद
  • काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार (२०१३)
  • पुणे मसापचा कवी यशवंत पुरस्कार.
  • पुणे मसापचा कवी भा.रा. तांबे पुरस्कार.
  • सोलापूरचा दमाणी साहित्य पुरस्कार.
  • राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाचा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार.[१]
  • नांदेडचा प्रसाद बन साहित्य पुरस्कार.
  • जालन्याचा हरिश्चंद्रराय दुःखी पुरस्कार.
  • लोणी(प्रवरानगर)चा पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार.
  • कळमनुरीचा स्वातंत्र्यसैनिक कोंडबाराव जरोडेकर पुरस्कार.
  • सेलूचा स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर साहित्य गौरव पुरस्कार.

साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद[संपादन]

  • मराठवाडा मराठी साहित्य संमेलन, २००९
  • पहिले गुणीजन साहित्य संमेलन २००५, औरंगाबाद.
  • ८७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सासवड इ.स. २०१४
  • महाराष्ट्र राज्य कामगार साहित्य संमेलन, नांदेड
  • अस्मितादर्श साहित्य संमेलन, अमरावती
  • परभणी जिल्हा साहित्य संमेलन, सोनपेठ
  • दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, कुंभारगाव
  • नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य संमेलन, नांदेड
  • आंबेडकरी साहित्य संमेलन, पुलगाव
  • परिवर्तन साहित्य संमेलन, अहमदपूर
  • मराठी साहित्य संमेलन, निपाणी (बेळगाव)
  • शेकोटी साहित्य संमेलन, पणजी
  • अत्रे साहित्य संमेलन, सासवड
  • महाराष्ट्र युवक साहित्य संमेलन, नाशिक
  • ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, विटा
  • साहित्यिक कलावंत संमेलन, पुणे
  • वारणेचा वाघ साहित्य संमेलन, कोडोली
  • राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन, तुळजापूर
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन, राळेगाव
  • शब्दगंध साहित्य संमेलन, अहमदनगर
  • सीमावर्ती मराठी साहित्य संमेलन, कोवाड

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "फ. मु. शिंदे, प्रशांत मोरे यांना अण्णा भाऊ साठे गौरव पुरस्कार". Archived from the original on 2015-09-14. २ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.