Jump to content

बदक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
pato (es); Önd (is); بَطُخ (ks); Itik (ms); duck (en-gb); Ördek (tr); kačica (sk); Guit (oc); Яксярга (mdf); Änte (gsw); Үйрек (kk); патка (mk); canard (fr); Patka (hr); яксярго (myv); बदक (mr); اردک (glk); ବତକ (or); Pīlė (sgs); патка (sr); and (nb); Meri (su); Papiy (crh); 鴨 (lzh); بط (ar); Houad (br); ဘဲ (my); 鴨 (yue); Ap-è (hak); Coríu (ast); Aant (nds); hwyaden (cy); Rosa (sq); патка (sr-ec); 鸭 (zh); gbunyaɣu (dag); იხვები (ka); Ent (pdc); agwagwa (ha); Unkalla (ay); Duck (na); තාරාවා (si); Anas (la); बतख (hi); 鸭 (wuu); ਬਤਕ (pa); Canård (wa); лыдывлӓ (mrj); வாத்து (ta); качкі (be-tarask); үрдәкләр (tt-cyrl); Pàpara (scn); la᷅yhák (mcn); Paphi (rup); เป็ด (th); Patke (sh); Annia (lij); Oante (stq); Itik (bcl); cicip (atj); سیکا (mzn); патица (bg); Càn·nàr (pcd); Rață (ro); Kivadangu (kg); Ganagana (mg); Нугаhан (bxr); Iték (ace); Anado (io); ເປັດ (lo); Ördek (ug); anaso (eo); patu (pap); Anade (an); Bit (za); Ák (cdo); Bèbèk (jv); Кăвакал (cv); vịt (vi); pīle (lv); Eend (af); Боабашкаш (inh); Imbata (rn); pato (pt-br); Deuk (sco); нугас (mn); Ah (nan); Bébék (ban); ಬಾತುಕೋಳಿ (kn); مراوی (ckb); duck (en); Antis (lt); kacsa (hu); બતક (gu); 𐌰𐌽𐌰𐌸𐍃 (got); Ahate (eu); Tunnag (gd); բադեր (hy); اؤردک (azb); Pato (war); Enten (de); Бадаш (ce); качкі (be); 鴨 (gan); ente (nds-nl); Bebe (nia); हाँस (ne); Libatá (ln); مرغابی (fa); eenden (nl); Bibi (pam); Daakiyyee (om); ברווז (he); үрдәкләр (tt); ዳክዬ (am); ទា (km); ᱜᱮᱰᱮ (sat); ܒܛܐ (arc); Anade (sc); ꯉꯥꯅꯨ (mni); Sorz (vep); ànec (ca); anatra (it); and (sv); Aenj (li); Kanna (ht); Mitiq (ik); Ордек (av); and (nn); kachna (cs); হাঁস (bn); カモ (ja); बदक (gom); pato (pt); Ened (ang); 오리 (ko); हाँस (dty); हँय् (new); raca (sl); Bibi (tl); Anàdra (eml); качки (uk); Bebek (id); kaczka (pl); താറാവ് (ml); Abṛik (kab); Dhadha (sn); Кустар (sah); بدڪ (sd); lacha (ga); Pato (gl); and (da); Πάπια (el); утки (ru) especie de pájaro que suele habitar en lagos (es); несколько родов птиц семейства утиных (ru); aderyn o deulu'r Anatidae (cy); common name for many species in the bird family Anatidae (en-gb); уобичајено име за многе врсте из породице птица Anatidae (sr-ec); fællesbetegnelse for mange arter i fuglefamilien Anatidae (da); Ördekgiller familyasından bir hayvan türü (tr); カモ目カモ科の鳥類のうち一部のものの総称 (ja); עוף (he); 오리과에 속하는 새들의 총칭 (ko); åwidî avou on lådje betch (wa); jméno pro menší vodní vrubozobé ptáky (cs); espesie di parha (pap); nome comune per molte speci di uccelli della famiglia delle Anatidae (it); এনাটিডি পাখি পরিবারের বিভিন্ন জাতের পাখির সাধারণ নাম (bn); terme générique qui désigne des oiseaux aquatiques (fr); ॲनॅटिडी पक्षी कुटुंबातील बर्याच जातींसाठी सामान्य नाव (mr); một loài động vật thuộc lớp Chim (vi); уобичајени назив за многе врсте у породици птица Anatidae (sr); اتی ئو دله مرغ نوم (mzn); termo genérico para pássaros da família Anatidae (pt-br); varietate de specii din familia Anatidae (ro); ชื่อสามัญของสัตว์ปีกหลายสปีชีส์ในวงศ์ Anatidae (th); potoczna nazwa niektórych ptaków (pl); common name for many species in the bird family Anatidae (en); algemene naam voor bepaalde soorten vogels uit de familie eendachtigen (nl); एउटा पन्छिको प्रजातिमा पर्ने एक चरा (ne); termo genérico para pássaros da família Anatidae (pt); 水禽也,屬鳥綱雁形目鴨科鴨亞科。或食草或食魚,或居田野或居湖沼。鴨之羽可作枕,其糞可肥田。故曰:鴨者,水禽之佳也。 (lzh); nom comú que reben un bon nombre d'espècies d'ocells de la família dels anàtids (Anatidae) (ca); ave da familia dos anátidos (gl); كائن حي (ar); گونه‌ای از مرغابی‌سانان (fa); ᓯᐦᓯᑉ (cr) шенже (myv); Ente (de); 🦆 (en-gb); بیلی, اوردک, سیگا, سی کا, اردک, ئوردک, 🦆, مرغابی (mzn); патка (bg); 🦆 (sr); racman, racak (sl); 鴨 (ja); Drakidraky (mg); 🦆 (th); 鴨, 鴨子, 鸭子 (zh); ànnera (ca); eend (nl); änder, Anatidae (sv); cane (wa); утка (ru); ئۆردەك (ug); Duckies, DUCK, Ducks, 🦆 (en); البطة, البط, بطية, إوزية, البطية, 🦆, بطيات, بطة (ar); kachny (cs); 🦆 (sr-ec)
बदक 
ॲनॅटिडी पक्षी कुटुंबातील बर्याच जातींसाठी सामान्य नाव
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारorganisms known by a particular common name (बदक)
उपवर्गपक्षी,
productive animal,
कुक्कुट
याचे नावाने नामकरण
  • diver (Proto-West Germanic, duck)
वापर
भाग
  • duckling
पासून वेगळे आहे
  • Kaczka
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बदक हा एक उभयचर पक्ष्यांचा वर्ग आहे. हे पक्षी पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी संचार करू शकतात.बदक हा पक्षी ॲनॅटिडी पक्षिकुलाच्या ॲनॅटिनी या उपकुलात याचा समावेश केलेला आहे. या उपकुलात सुमारे १२० जाती असून दक्षिण ध्रुव-प्रदेश सोडून जगाच्या निरनिराळ्या भागांत त्या आढळतात. बदक हा पाणपक्षी आहे. काही जाती केवळ गोड्या पाण्याच्या जवळपास राहणाऱ्या असतात, तर काही केवळ समुद्री असून त्यांची वीण नदीमुखाजवळ किंवा समुद्र-किनाऱ्यावर होते.

शारीरिक रचना[संपादन]

बदक

बदक हंसापेक्षा लहान आणि शरीराने स्थूल असते. मान आणि पाय आखूड असतात. पाय शरीराच्या बऱ्याच मागच्या बाजूला असतात. त्यांचा रंग पिवळा असून त्यांच्यावर पुढे तीन व मागे एक बोट असते; पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात. चोच मोठी, रुंद, चापट व पिवळी असते; ती पातळ त्वचेने झाकलेली असते. चोचीच्या दोन्ही कडांवर बारीक दात असतात.सामान्यतः नर व मादी यांच्या शरीराची रंगव्यवस्था वेगळी असते. पाळीव बदकांचा रंग सामान्यपणे पांढरा असतो;पण काहींचा काळा किंवा तपकिरी असून त्यात हिरवट चमक असते; काहींचे धड पांढरे पण डोके व मान काळी असते. अंगावरील पिसे अतिशय दाट असून शेपटीच्या बुडाशी असलेल्या तेलग्रंथीचा स्त्राव बदके आपल्या चोचीने पिसांना नेहमी चोपडतात; त्यामुळे पाण्यात पोहताना ती पाण्याने भिजत नाहीत. शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्यामुळे थंडीपासून निवारण होऊन शरीराची उष्णता कायम रहाते. पिसे दर वर्षी गळून पडून नवी येतात.

आढळणारे प्रदेश[संपादन]

बदक हा पक्षी दक्षिण ध्रुव-प्रदेश सोडून जगाच्या निरनिराळ्या भागांत त्या आढळतात. इंडोनेशिया, तैवान व आग्नेय आशियातील काही देशांमध्ये बदकांची संख्या बरीच आहे. अमेरिकेतील ६० टक्के बदके लॉंग आयलंड या भागामध्ये आहेत. बहुसंख्य बदके पूर्व व दक्षिण भारतामध्ये आहेत. १९६६ च्या पशुधन गणनेनुसार भारतातील बदकांची संख्या ९९ लाखाच्या आसपास होती. पश्चिम बंगालमध्ये त्यांची संख्या सर्वात जास्त म्हणजे ५३ लाख ३० हजारांच्या आसपास होती व त्यानंतर आसाम, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ बिहार व ओरिसा या राज्यांच्या क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील बदकांची संख्या ४२,८०० होती.

विविध जाती[संपादन]

पाळीव बदकांच्या १८ जाती आणि ३४ प्रकार असून ते सर्व दक्षिण अमेरिकेतील मस्कोव्ही व उत्तर गोलार्धातील मॅलार्ड या रानटी बदकांच्या दोन जातींपासून उत्पन्न झाले आहेत. पाळीव जातींमध्ये ‌तऱ्हेतऱ्हेचे रंग दिसून येतात; शिवाय त्यांचे वजनही रानटी जातींपेक्षा तिप्पट असू शकते. बहुसंख्य जाती मॅलार्ड या जातीपासून निघालेल्या आहेत. कॅंबेल जातीमधील खाकी कॅंबेल ही बदकाची जात अंड्याविषयी प्रसिद्ध असून तिच्यापासून सरासरीने वर्षाला ३६५ अंडी मिळालेली आहेत. कोंबड्यांची सरासरी क्वचितच ३०० अंड्यांपेक्षा अधिक असते. अंड्यांच्या बाबतीत खाकी कॅंबेलनंतर व्हाइट कॅंबेल, डार्क कॅंबेल व इंडियन (देशी) रनर या जातींचा क्रमांक लागतो. मस्कोव्ही, पेकिन व आयलेसबरी बया बदकांच्या जाती मांसोत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. अमेरिका व युरोपातील देशांमध्ये पहिल्या दोन जाती पाळल्या जातात, तर इंग्लंडमधिल लोक आयलेसबरी बदके पसंत करतात. या देशांमध्ये मांसोत्पादक बदकाच्या पिलांचे उत्पादन करणे हा एक संघटित व्यवसाय आहे. आयलेसबरी बदकांचे मांस पांढरे तर पेकिनचे पिवळे असते.

भारतामध्ये बदकांच्या पुढील जाती आहेत : इंडियन रनर, सिल्हेट मेटा व व्हाइट ब्रेस्टेड नागेश्वरी. इंडियन रनर बदके पांढऱ्या रंगाची असतात, तर सिल्हेट मेटा बदके तपकिरी रंगाची असून त्यांच्या पंखांची टोके काळी असतात व चोच पिवळी असते. नागेश्वरी जातीच्या बदकांचे शरीर काळ्या रंगाचे असते; पण छाती व गळा पांढरा असतो.

बदकांच्या अनेक जाती आहेत.

बदक पालन व्यवसाय[संपादन]

कोंबड्याप्रमाणे अंडी व मांस यांच्या उत्पादनासाठी बदके जगामध्ये सर्वत्र पाळली जातात. तथापि व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर ती फारच कमी प्रमाणात पाळण्यात येतात. भारतामध्ये बदके मुख्यत्वे अंड्यांसाठी पाळण्यात येतात. साधारणपणे दमट हवामानामध्ये हा व्यवसाय केला जातो. समुद्र किनाऱ्यालगत किंवा ज्या भागात भाताचे पीक जास्त होते अशा भरपूर पाऊस पडणाऱ्या भागामध्ये बदक पालन चांगले करता येते. म्हणजे कोकण हा भाग बदक पालनासाठी अनुकूल आहे. बदकाच्या पालनात कोंबडी पालनापेक्षा काही जास्त फायदे आहेत. बदकांना कोंबडीपेक्षा कमी खाद्य लागते. बदकाचे पालन पिंजऱ्यात न करता साचलेल्या किंवा साचवलेल्या पाण्यात केले जात असल्यामुळे त्यांना पाण्यातच बरेचसे खाद्य सापडते. कोंबडीपेक्षा बदकांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते आणि बदकांची अंडी देण्याची क्षमताही जास्त असते. बदकाची मादी कोंबडीपेक्षा वर्षाला ४० ते ५० जास्त अंडी देतात, शिवाय बदकाचे अंडे कोंबडीच्या अंड्यापेक्षा १५ ते २० ग्रॅम जास्त वजनदार असते आणि त्यामध्ये कोंबडीच्या अंड्यापेक्षा अधिक पोषक द्रव्ये असतात. बदक सर्वभक्षक आहे. बदक गवत, पाने, फळे आणि बारीक मासे सुद्धा खातात. ज्यामुळे बदकांना खाद्य नेहमी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.

हे सुद्धा पहा[संपादन]

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]