Jump to content

बेतवा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेतवा नदी ही भारतातील उत्तर प्रदेशमध्य प्रदेश राज्यांतून वाहणारी नदी आहे. हिचा उगम हुशंगाबाद शहराच्या उत्तरेस विंध्य पर्वतमालेत झाला आहे. साधारण ईशान्येकडे वाहत ही नदी ओरछा शहराजवळ यमुना नदीस मिळते.

या बेतवा नदीच्या काठी भीमबेटकापासून दक्षिणेला २५ किलोमीटरवर भोजपूर नावाचे गाव आहे. परमार घराण्याचा प्रसिद्ध राजा भोज याच्यावरून हे नाव पडल्याचे सांगतात. येथे असलेले भोजेश्वर हे महादेवाचे मंदिर अतिप्राचीन आहे. विटांनी बांधलेल्या या मंदिरावर आज शिखर नाही. परंतु या मंदिरात असलेली १८ फूट उंच शंकराची पिंडी खास बघावी अशी आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथेच बाजूला असलेल्या दगडावर या मंदिराचे स्थापत्य नियोजन कोरलेले आहे.