Jump to content

भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत अंडर-१९
असोसिएशन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
कर्मचारी
कर्णधार उदय सहारन
प्रशिक्षक हृषीकेश कानिटकर
संघ माहिती
रंग निळा
स्थापना १९७९
इतिहास
आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक विजय (२०००, २००८, २०१२, २०१८, २०२२)
एसीसी अंडर-१९ आशिया कप विजय (१९८९, २००३, २०१२, २०१३-१४, २०१६, २०१८, २०१९, २०२१)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेश आशिया

कसोटी किट

वनडे किट

टी२०आ किट

११ जून २०२३ पर्यंत

१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार पवन शाह हा आहे. प्रशिक्षक पदावर माजी भारतीय खेळाडू राहूल द्रवीड हे आहेत.

१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने आज पर्यंत ४ वेळा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. सन २००० मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली, २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, २०१२ मध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली तर २०१८ मध्ये पृथ्वी शॉ हा कर्णधार असताना भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. याशिवाय १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या एकदिवसीय सामन्यांतील ७७% सामने जिंकले आहेत. ही सरासरी इतर कोणत्याही १९ वर्षांखालील क्रिकेट संघापेक्षा जास्त आहे. [१]

सध्याचा संघ[संपादन]

खालील खेळाडू हे गेल्या ६ महिन्यांत संघात आहेत. आयुष बदोनी (दिल्ली) समीर चौधरी (उत्तर प्रदेश) सिद्धार्थ देसाई (गुजरात) अजय देव गौड (हैदराबाद) यशस्वी जयस्वाल (मुंबई) मोहित जंगरा (उत्तर प्रदेश) आर्यन जुयाल (उत्तर प्रदेश) सबीर खान (बिहार) यतीन मांगवानी (महाराष्ट्र) राजेश मोहंती (ओडिशा) देवदत्त पाडिक्कल (कर्नाटक) आकाश पांडे (गुजरात) यश राठोड (विदर्भ) अनुज रावत (दिल्ली) पवन शाह (महाराष्ट्र) प्रभसिमरन सिंह (पंजाब) अथर्व तायडे (विदर्भ) अर्जुन तेंडुलकर (मुंबई) हर्ष त्यागी (दिल्ली) नेहर वढेरा (पंजाब)


अलिकडील कामगिरी[संपादन]

उन्मुक्त चंदच्या कर्णधार पदाला साजेश्या खेळीमुळे २६ ऑगस्ट २०१२ रोजी, भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने ९वा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक ६ गडी राखून जिंकला. विजयासाठी ऑस्ट्रेलियाने भारताला २२६ धावांचे आव्हान दिेले होते. [२]

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक मालिकेतील कामगिरी[संपादन]

वर्ष यजमान देश निकाल
१९८८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ५ वे स्थान
१९९८ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ५ वे स्थान
२००० श्रीलंका श्रीलंका विजेते
२००२ न्यूझीलंड न्यू झीलंड उपांत्य फेरी
२००४ बांगलादेश बांग्लादेश उपांत्य फेरी
२००६ श्रीलंका श्रीलंका उपविजेते
२००८ मलेशिया मलेशिया विजेते
२०१० न्यूझीलंड न्यू झीलंड ६ वे स्थान
२०१२ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया विजेते
२०१४ संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती ५ वे स्थान
२०१६ बांगलादेश बांग्लादेश उपविजेते
२०१८ न्यूझीलंड न्यू झीलंड विजेते
२०२० दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका उपविजेते

संदर्भ आणि नोंदी[संपादन]