Jump to content

मुंबईचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१७६० मधील मुंबईचा नकाशा

मुंबईचा इतिहास पंधराव्या शतकापासून ज्ञात आहे. तेव्हा बहमनी सुलतानांच्या आधिपत्याखाली असलेला हा प्रदेश गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने जिंकून घेतला. त्याच्या वंशजांनी पुढे हा प्रदेश पोर्तुगीजांच्या हवाली केला.