Jump to content

रतनजी टाटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रतन जमशेदजी टाटा या पानावरून पुनर्निर्देशित)

सर रतनजी जमसेटजी टाटा (२० जानेवारी, १८७१:मुंबई, ब्रिटिश भारत - ५ सप्टेंबर, १९१८:कॉर्नवॉल, युनायटेड किंग्डम) हे भारतीय उद्योगपती आणि दानशूर होते.

हे जमसेटजी टाटा यांचे पुत्र असून त्यांच्या मृत्यूनंतर रतनजी आणि दोराबजी या भावांनी जमसेटजींचे उद्योग सांभाळले.

यांनी अनेक ऐतिहासिक वस्तू एकत्र केल्या होत्या. १९२३मध्ये या वस्तू टाटांच्या कुटुंबियांनी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाला (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय) दान केल्या.

टाटांच्या मृत्यूनंतर १९१९ साली सर रतन टाटा ट्रस्ट ही समाजकारणी संस्था ८० लाख रुपयांसह (आताचे ७५ कोटी रुपये) स्थापन झाली.