Jump to content

रवींद्र कोल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉक्टर रवींद्र कोल्हे हे मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील बैरागड येथे त्यांच्या पत्नी स्मिता कोल्हे यांच्या बरोबर वैद्यकीय सेवा पुरवतात.ते बैरागड येथे एका लहानशा घरात राहतात.

त्यांना नाशिक मधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे २०१८ सालचा गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. २० जानेवारीला जाहीर झालेला हा पुरस्कार १० मार्चला नाशिक येथे देण्यात येईल.

रवींद्र कोल्हे व त्यांची पत्नी स्मिता कोल्हे यांना नुकताच २६ जानेवारी २०१९ रोजी भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे.हा पुरस्कार या दोघांना संयुक्तरीत्या देण्यात आलेला आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ गृह मंत्रालय भारत सरकार. "MINISTRY OF HOME AFFAIRS PRESS NOTE - S.No. 61" (PDF). २७ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. line feed character in |title= at position 25 (सहाय्य)