Jump to content

लम्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लम्हे
दिग्दर्शन यश चोप्रा
कथा हनी इराणी, राही मासूम रझा
प्रमुख कलाकार श्रीदेवी
अनिल कपूर
वहिदा रेहमान
अनुपम खेर
संगीत शिव-हरी
पार्श्वगायन लता मंगेशकर, हरिहरन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २२ नोव्हेंबर १९९१
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १८७ मिनिटे



लम्हे (मराठी: क्षण) हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये श्रीदेवी (आई आणि मुलगी अशा दुहेरी भूमिकेत), अनिल कपूर, वहिदा रेहमानअनुपम खेर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट यश चोप्राच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक समजला जातो. समीक्षकांनी नावाजून व अनेक पुरस्कार मिळवून देखील हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला.

कथानक[संपादन]

लम्हे ही गोष्ट आहे क्षणांची, उत्कटतेच्या क्षणांची... आनंदाच्या क्षणांची... प्रेमाच्या क्षणांची जे आयुष्य बदलून टाकतात. जेव्हा तरुण वीरेन (अनिल कपूर) पहिल्यांदा भारतात येतो तेव्हा त्याला पल्लवीने (श्रीदेवी) मोहित केले. जेव्हा त्याला कळते की तिचं लग्न आधीच ठरलेलं आहे, तेव्हा तो दुःखी होऊन लंडनला परत येतो. जेव्हा त्याला पल्लवी आणि तिचा नवरा मरण पावल्याची आणि त्यांची मुलगी पूजा (श्रीदेवी) ही एकटी पडल्याची बातमी मिळते, तेव्हा वीरेन तिची काळजी घेतली जाईल याची खात्री घेतो. आता सुमारे २० वर्षांनंतर, वीरेन भारतात परत येतो आणि पूजाला पहिल्यांदा पाहतो... तिच्या आईची हुबेहुब प्रतिमा! वीरेनला असे वाटते की नियतीने त्याच्याशी क्रूर खेळ खेळला आहे जेव्हा पूजा कबूल करते की ती त्याच्यावर प्रेम करते... अजून एक क्षण जो त्याचे आयुष्य बदलून टाकतो... कायमचा.

कलाकार[संपादन]

पुरस्कार[संपादन]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[संपादन]

  • सर्वोत्तम वेशभुषा

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]