Jump to content

लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सहावे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन ६ आणि ७ जून २०१० या दिवशी उमरी(जिल्हा नांदेड) या गावी झाले. कविवर्य इंद्रजित भालेराव संमेलनाध्यक्ष होते. संमेलनात जिल्ह्यातील भजनीमंडळींची भजन स्पर्धा, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, परिसंवाद, कथाकथन आणि ‘लोकसंवाद पुरस्कारां’चे वितरण होऊन नंतर कविसंमेलन झाले.

आधीची संमेलने :

  • पाचवे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन २२ फेब्रुवारी २००९ रोजी करकाळा(तालुका उमरी, जिल्हा नांदेड) येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष प्राचार्य सु.ग. चव्हाण होते. संमेलनात आधी ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन होऊन नंतर संमेलनाचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर, लोकसंवाद पुरस्कारांचे वितरण, कथाकथन आणि कविसंमेलन झाले. कविसंमेलनासाठी विशेष निमंत्रित म्हणून कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर व कवी नारायण सुमंत आले होते.