Jump to content

ल.म. कडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ल.म. कडू (जन्म : १० जुलै १९४७) हे एक मराठी चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक आहेत. त्यांची बालसाहित्याची सुमारे ३० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इ.स. १९७७ च्या सुमारास त्यांनी 'गमभन' ही प्रकाशन संस्था काढली. या प्रकाशन संस्थेने चाळीस वर्षांत दोनशे पुस्तके प्रकाशित केली. प्रकाशनातर्फे ‘साहित्य वैभव’ ही दिनदर्शिका २००४ सालापासून, आणि मुलांसाठी गमभन ही दिनदर्शिका २००५पासून प्रकाशित होत आली आहे.

मुलांना निसर्गाचा परिचय व्हावा यादृष्टीने कडू यांनी पानशेतजवळ सात एकर जागेवर ‘विद्याविहार पर्यावरण’ हा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाला काही वर्षांतच हजारो मुलांनी भेट दिली.

ल.म. कडू यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • A Tree झाड (लहान मुलांसाठीचे द्विभाषिक पुस्तक)
  • खारीच्या वाटा (कथासंग्रह)
  • गलोलची करामत
  • चार्ली चॅप्लिन
  • छोटे दोस्त
  • जॉर्ज कार्व्हर (चरित्र)....(विशेष - वीणा गवाणकर यांनीही याच विषयावर 'एक होता कार्व्हर' हे पुस्तक लिहिले आहे.)
  • पवित्र सेवा रेड क्राॅस
  • पिंटू आणि बेडूक आजोबा
  • मनीचे डोळे
  • मारिया माँटेसरी
  • मुलांचे बापू
  • राधाची स्ट्राॅबेरी
  • रावीचा मोर (बालसाहित्य)
  • शालेय स्फूर्तिगीते
  • सईची चांगली सवय
  • हवं तर रंगवा
  • मी चित्रकार कसा झालो

पुरस्कार, सत्कार आणि सन्मान[संपादन]

  • साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार (२०१७) - खारीच्या वाटा या पुस्तकासाठी.[१][२]
  • महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार (२०१४) - खारीच्या वाटासाठी. [३]
  • त्याच पुस्तकासाठी परिवर्तन, बी.रघुनाथ पुरस्कार आणि भैरूरतन दमाणी पुरस्कार.[४]
  • मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित केलेल्या‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाच्या उदघाटनाचे कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ल.म. कडू यांचा मसापतर्फे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते शाल, पुष्पहार आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. (२८-६-२०१७)[५]
  • शेवगांव(अहमदनगर जिल्हा) येथे २७ ते २९ जानेवारी २०१८ या काळात झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ल. म. कडू -Maharashtra Times". Maharashtra Times. 2017-06-24. 2018-08-02 रोजी पाहिले.
  2. ^ जुवेकर, रोहन. "ल. म. कडू | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2019-03-22. 2019-03-22 रोजी पाहिले.
  3. ^ "पुरस्काराने कामाचे चीज झाले - ल. म. कडू". लोकमत. २३ जून २०१७. ३० जून २०१९ रोजी पाहिले.
  4. ^ "पुरस्काराने कामाचे चीज झाले - ल. म. कडू". लोकमत. २३ जून २०१७.
  5. ^ "साधनांशिवाय साधना करायला शिका : ल. म. कडू". www.bytesofindia.com. 2018-08-02 रोजी पाहिले.