Jump to content

वॉशिंग्टन मेट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉशिंग्टन मेट्रो
स्थान वॉशिंग्टन, डी.सी., उत्तर व्हर्जिनिया, दक्षिण मेरीलँड
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग
मार्ग लांबी कि.मी.
एकुण स्थानके ९१
दैनंदिन प्रवासी संख्या ७,५१,५३८ (जून २०१४)
वार्षिक प्रवासी संख्या २० कोटी ९० लाख
सेवेस आरंभ २७ मार्च, इ.स. १९७६
कार्यकारी अधिकारी जॅक रेका (तात्पुरता मुख्याधिकारी)
मुख्यालय ६००, फिफ्थ स्ट्रीट नॉर्थवेस्ट, वॉशिंग्टन, डी.सी - २०००१
संकेतस्थळ www.wmata.com अधिकृत संकेतस्थळ
मार्ग नकाशा

DC Metro Map 2013.svg

वॉशिंग्टन मेट्रो ही भुयारी रेल्वे वॉशिंग्टन, डी.सी. शहर आणि उपनगरांना जोडणारी रेल्वेसेवा आहे. याला मेट्रो किंवा मेट्रोरेल नावांनीही ओळखले जाते.

वॉशिंग्टन मेट्रो अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची (न्यू यॉर्कनंतर) सर्वाधिक वर्दळीची भुयारी रेल्वेसेवा आहे. २००८ साली यातून २१ कोटी ५३ लाख प्रवाशांनी याचा वापर केला. ही सेवा वापरण्याचे मूल्य अंतर, वेळ तसेच तिकिटाच्या प्रकारावरून ठरते.