Jump to content

सांता क्लारा (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांता क्लारा हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. सान फ्रांसिस्को बे एरियाचा एक भाग समजले जाणारे हे शहर सांता क्लारा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.

येथे अनेक उच्चतंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये आहेत.

२०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१६,४८४ होती. या शहराला याच जागेवर इ.स. १७७७मध्ये बांधण्यात आलेल्या कॅथोलिक मिशनचे नाव दिलेले आहे.