Jump to content

हंबन्टोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हंबन्टोटा (सिंहला भाषा: හම්බන්තොට, तमिळ भाषा: அம்பாந்தோட்டை) श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील शहर आहे. हंबंटोटा प्रांताची राजधानी असलेले हे शहर २००४ च्या त्सुनामीमध्ये उद्ध्वस्त झाले होते. याची आता पुनर्रचना होत असून येथे मोठे समुद्री बंदर, आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच क्रिकेटचे मैदान उभारण्यात येत आहेत. या क्रिकेटच्या मैदानात २०११ च्या क्रिकेट विश्वचषकाचे सामने खेळण्यात आले.