Jump to content

समांतर (मराठी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समांतर
दिग्दर्शन अमोल पालेकर
कथा संध्या गोखले
पटकथा संध्या गोखले
प्रमुख कलाकार
संवाद संध्या गोखले
संकलन अभिजीत देशपांडे
छाया असीम बोस
गीते सौमित्र
संगीत आनंद मोडक
पार्श्वगायन शंकर महादेवन श्रेया घोषाल सुदेश भोसले
वेशभूषा संध्या गोखले ,नीरजा गुप्ता
रंगभूषा गीता गोडबोले
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}


[ चित्र हवे ] समांतर हा अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेला एक मराठी चित्रपट असून यात उद्योगपती केशव आणि शमा या दोन व्यक्तिरेखांच्या एकटेपणाची कथा आहे.

संक्षिप्त[संपादन]

आक्रित’,‘पहेली’, ‘बनगरवाडी’, ‘अनाहत’, ‘थांग’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध अभिनेता अमोल पालेकर यांनी ‘समांतर’ या चित्रपटाची निर्मिती इ.स. २००९ मध्ये केली. बिग पिक्चर्स बॅनरचा पहिला मराठी चित्रपट, हिंदी-बंगाली चित्रपटातील ख्यातनाम अभिनेत्री आणि सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा शर्मिला टागोर यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. अमोल पालेकर यांनी केशव वझे ही व्यक्तिरेखा अतिशय सुरेख प्रकारे साकारली आहे. समांतरची पटकथा व संवाद लिहिणाऱ्या संध्या गोखले यांनी जेंव्हा या चित्रपटाचे कथानक अमोल पालेकर यांना सांगितले तेव्हा ते त्याना इतके आवडले होते, की ते गोखले यांना म्हणाले मी या चित्रपटात प्रमुख भूमिका करेन. या चित्रपटाचे चित्रांकन पुणे आणि कोलकात्यापासून काहिशा अंतरावर असणाऱ्या कोलना याठिकाणी केले गेले.[१]

कथानक[संपादन]

गतायुष्यात अर्धवट राहून गेलेली भावनिक गुंतवणूक आणि उत्तरायुष्यात त्याची सव्याज परतफेड करावी की नाही असा गुंता असा या चित्रपटाचा विषय आहे.

कलाकार[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ सुनिल नांदगांवकर. "बंदिस्त पटकथा, आशयगर्भ संवाद हे समांतरचे वैशिष्ट्य-अमोल पालेकर". February 09, 2012 रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)