Jump to content

आदि पर्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Drustadyumnya telling aboy ruls of Swayamavara.jpg
द्रौपदीचे स्वयंवर

आदि पर्व हे महाभारतातील पहीले आणि सर्वांत मोठे पर्व आहे. या पर्वात मुख्यत्वे भारतवर्षाचे वर्णन असून त्यावर राज्य करणाय्रा राजांचे व त्यांच्या राज्यातील घडामोडीचे वर्णन आले आहे. नावाप्रमाणेच आदि पर्वात सर्व बाह्य घडामोडी उघड पडतात.

मुख्य पर्वांची यादी[संपादन]

महाभारतात १८ प्रमुख पर्व आहेत. ते पुढीलप्रमाणे:

क्र. पर्व संदर्भ
अनुक्रमणिक पर्व महाभारताची सुरुवात आणि सौतिंद्वारे ते नैमिषारण्यात ऋषींना कसे सांगण्यात आले याची संपूर्ण माहिती
पौष्य पर्व जनमेजयाचे सर्पयज्ञ करण्याचे कारण-उतंक आणि पौष्य राजा
पौलोम पर्व जनमेजयाचा सर्पयज्ञ
अस्तिक पर्व अस्तिक ऋषींद्वारे सर्पांची यज्ञातून मुक्तता
आदिवंश-अवतरण पर्व व्यासांनी रचलेले 'भारत' हे काव्य सौतींद्वारे शौनकाला सांगण्यात आले
संभव पर्व सृष्टीनिर्माणाची कथा व कुरुवंशाची संपूर्ण कथा
जतुगृह-दाहन पर्व पांडवांना नैमिषारण्यात कौरवांद्वारे करन्यात आलेला जाळण्याचा प्रयत्न
हिडिंब वध पर्व वनात हिडिंब राक्षसाचा भीमाने केलेला वध आणि भीम-हिडिंबा विवाह
बक-वध पर्व बकासुराचा भीमाने केलेला वध
१० चैत्ररथ पर्व पांडवांच्या सांगण्यावरून गंधर्वराज चित्ररथ्आने केलेले दुर्योधनाच्या पत्नींचे हरण
११ स्वयंवर पर्व पांचाल नरेश पुत्री द्रौपदीचे स्वयंवर आणि अर्जुनाशी विवाह
१२ वैवाहिक पर्व पांडवांशी द्रौपदीचे लग्न
१३ विदुरगमन पर्व विदुराचा महामंत्रीपदाचा त्याग व विदुराने पांडवांना दिलेली भेट
१४ राज्यलाभ पर्व युधिष्ठिराचा युवराज म्हणून केलेला अभिषेक
१५ अर्जुन वनवास पर्व अर्जुनाचा नियमोल्लंघन केल्यामुळे झालेला वनवास
१६ सुभद्रा हरण पर्व श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने केलेले सुभद्रा हरण
१७ हरण-हरिक पर्व कृष्ण आणि पांडवांची भेट
१८ खांडव दाह पर्व खांडवप्रस्थाचे दहन करून त्याचे इंद्रप्रस्थात केलेले रूपांतर